डोंबिवली :- येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत मस्करी करताना एका महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना डोंबिवली कल्याण शीळ रोड वर घडली आहे. मृत महिला नगीनादेवी मंजिराम असे तिचे नाव असून, ती त्या इमारतीमध्ये सफाईचे काम करत होती.ती पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.
घटना कशी घडली?
डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोड वरील विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करत होती. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत.आज दुपारच्या सुमारास नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसलेली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा तिला हात लागला व नगीनादेवीचा तोल गेल्याने ती क्षणार्धात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली.
पोलिसांचा तपास-
या घटनेनंतर नगीनादेवीच्या सहकाऱ्यांचा बंटी नावाचा तरुणाचाही तोल गेला. मात्र त्याला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी वाचविले. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. मानपाडा पोलिसांनी या घटनेबाबत सखोल तपास सुरू केला असून, पुढील कारवाईसाठी आवश्यक माहिती गोळा केली जात आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






