भडगांव :- दिनांक १२/०८/२०२४ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पोलीस पाटील पिचर्डे यांनी फोनव्दारे
कळविले की, पिचर्डे ता. भडगाव गावी विठ्ठल आनंदा पाटील वय ४१ हे त्यांचे खळ्यात झोपलेले असतांना
त्यांचे डोक्यात कोणीतरी वार करुन खुन केलेला दिसत आहे बाबत कळविल्याने त्यावरुन खात्री करणेकामी
आम्ही पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर
डोमाळे, स.फौ.२७२७ अनिल अहिरे, पोहेकाँ २८८० निलेश ब्राम्हणकार, पोहेकाँ १५१३ मुकुंद परदेशी,पोकाँ
१९३२ प्रवीण परदेशी, पोकाँ ११८५ महेंद्र चव्हाण,
पोकाँ १६७६ सुनिल राजपुत, पोकाँ १५३७ संदिप सोनवणे, पोकाँ ७३५ जितेंद्र राजपुत असे जावुन खात्री केली असता विठ्ठल आनंदा पाटील हे पिचर्डे गावातील त्यांचे खळ्यात खाटीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. त्यांचे डोक्यावर धारधार शस्त्राने वार केलेले दिसत होते. सदर ठिकाणी धारधार शस्त्राने वार करणारा आरोपी मिळुन येईल असा कोणताही पुरावा दिसुन येत नव्हता.तेव्हा गावातुन माहिती घेवुन माहिती काढली असता मयत विठ्ठल आनंदा पाटील व त्यांचा मोठा
भाऊ अभिमन आनंदा पाटील यांच्यात शेतीच्या वाटनी वरुन वाद सुरु होता
काल दिनांक ११/०८/२०२४ रोजी सायकांळी १७.०० वाजेच्या सुमारास मयत विठ्ठल आनंदा पाटील हे त्यांचे खळ्यात बकऱ्या बांधण्यासाठी तारजाळी बांधणार असल्याने त्यास मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील हा विरोध करत असल्याने त्यांच्यात खळ्यातच भांडण झाल्याचे समजुन आले. सदर भांडणाचा धागा पकडुन आम्ही लागलीच मयत विठ्ठल आनंदा पाटील यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील याचा गावात व त्यांचे घरी
शोध घेतला असता ते त्यांचे घरी मिळुन आलेत.
तेव्हा त्यांचे घरात त्यांचे रक्ताचे भरलेले कपडे मिळुन
आल्याने त्यांना लागलीच पोलीस स्टेशनला आणुन त्यास कसोशीने विचारपुस करुन पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी त्यांचा लहान भाऊ विठ्ठल आनंदा पाटील यांचे डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खुनकेल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा हा २ तासाच्या आत उघडकीस आणला आहे. त्यावरुन मयत विठ्ठल आनंदा पाटील यांची पत्नी रेखाबाई विठ्ठल पाटील यांचे फिर्यादवरुन भडगाव पोलीस स्टेशनला गुरन २६०/२०२४ भारतीय न्याय सहिता २०२४ चे कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी सो, जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक
कविता नेरकर सो, चाळीसगाव परिमंडळ, मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री अभयसिंह देशमुख चाळीसगाव
भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री शेखर डोमाळे,
स.फौ.२७२७ अनिल अहिरे, पोहेकाँ २८८० निलेश ब्राम्हणकार, पोहेकाँ १५१३ मुकुंद परदेशी, पोकाँ १९३२
प्रवीण परदेशी, पोकाँ ११८५ महेंद्र चव्हाण, पोकाँ १६७६ सुनिल राजपुत, पोकाँ १५३७ संदिप सोनवणे, पोकाँ
७३५ जितेंद्र राजपुत, पोकाँ ३७१ संभाजी पाटील (चालक), होमगार्ड प्रदिप सुभाष पाटील यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






