आग्रा :– गेल्या काही दिवसांत अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी विवाहबाह्य संबंधांतून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे.त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलांचे वय लग्नाचे असताना महिलेला प्रेमात धुंद झाली आणि 2 वर्षांपूर्वीच प्रियकरासोबत पळून गेली. यानंतर आता या महिलेची फसवणूक झाली असून तिला प्रेमात धोका मिळाला आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
आग्रा पुलिस लाइनमध्ये शनिवारी आणि रविवारी कुटुंब समुपदेशन केंद्र लावले जाते. याठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला विवाहबाह्य संबंधात धुंद झाली होती. तिच्या मुलांचे लग्नाचे वय असताना तीच महिला स्वत: आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आणि आता तिला 2 वर्षांनी प्रियकराकडून धोका मिळाला आहे. यानंतर आता तिला आपला आधीचा पती आणि मुलांची आठवण येत आहे. पोलिसांसमोर हे प्रकरण आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.मुलीचे लग्नाचे वय असतानाच आईनेच दुसऱ्या लग्नाचे स्वप्न पाहिले.
विवाहित असताना, आपल्या मुलांचे लग्नाचे वय असताना ही महिला एका व्यक्तीच्या प्रेमात धुंद झाली. ते दोन्ही जण 2 वर्ष सोबत राहिले. नंतर त्या व्यक्तीने आपल्या या विवाहित प्रेयसी महिलेला धोका दिला. यानंतर आता तिला आपल्या पतीची आणि घराची आठवण आली.याबाबत समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महिलेच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक वेळ झाला आहे. महिलेला एक मुलगा आणि मुलगी आहे. दोघांचे वय लग्नाचे आहे.
मात्र, याच वेळी या महिलेला एका दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम झाले आणि ती आपल्या मुलांना, पतीला सोडून प्रियकरासोबत राहयला चालली गेली. ते दोन्ही जण 2 वर्ष सोबत राहिले. 2 वर्षांनी तिला प्रियकराने धोका दिला. त्यानंतर आता तिला आपल्या सासरची आठवणी आली. पण तिला पतीने सोबत ठेवायला नकार दिला. दरम्यान, याप्रकरणी समुपदेशन केले जात असून त्यांना पुढच्या तारखेला बोलावण्यात आले आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम