Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ गराळा घालत असतात. कधी कोणता व्हिडीओ चर्चेत येईल सांगता येत नाही. यामध्ये अनेक प्रकारचे डान्स व्हिडीओही पहायला मिळतात. अशातच एका शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. क्लासरुममध्ये महिला शिक्षक ‘कजरा रे’ गाण्यावर थिरकते.
शिक्षकांच्या डान्सचे बरेच व्हिडीओ आजकाल समोर येत आहेत. यात आणखी भर पडत एका महिला शिक्षिकेचा डान्स व्हिडीओ समोर आलाय. महिला क्लासरुममधील विद्यार्थ्यांसमोर ‘कजरा रे’ गाण्यावर ठेका धरते. महिला शिक्षिकेचा हा अंदाज इंटरनेटवर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.खरंतर, एका महिला शिक्षिकेचा वाढदिवस आहे आणि विद्यार्थ्यांनी टीचरचा वाढदिवस खास करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी क्लासरुम काहीशी सजवली आणि फलकावर वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
त्यानंतर महिला शिक्षिकेचा खास डान्सही झाला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शिक्षिका एकदम हावभाव करत गाणं एन्जॉय करत नाचते. तिच्या बाजूला काही विद्यार्थी आहेत तेदेखील तिच्या प्रोत्साहन देत आहेत.@yeazlas नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 27 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून व्हिडीओ भरपूर शेअर केला जातोय.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






