एरंडोल :- येथे गावठी पिस्तूल ताब्यात बाळगणाऱ्या एका २० वर्षीय युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. प्रविण रवींद्र बागुल (वय २०) असे या तरूणाचे नाव आहे. केवडीपुरा भागात राहणाऱ्या प्रविण रवींद्र बागुल या तरुणाकडे सिल्व्हर रंगाचे प्लास्टिक मूठ असलेले २५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती.
त्यावरून शनिवारी ११.३० वाजेच्या सुमारास एरंडोल शहरातील बीएसएनएल कार्यालया नजीक पिंप्री रोडवर पोलिसांनी सापळा लावला. प्रविण बागुल हा तेथे आला असता पोलिसांनी त्याला पकडून झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल, चोरीची दुचाकी व मोबाईल मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान आरोपी प्रविण रवींद्र बागुल यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






