Viral Video: सोशल मीडियावर रील्स व्हायरल होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. अनेक मजेशीर, गंभीर, अश्लील व्हिडीओ आजकाल सहज व्हायरल होतात. कळत-नकळतपणे अनेक लोक सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करतात आणि मग त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.त्यात अनेकदा सार्वजनिक ठिकाणी कपल्स रोमान्स आणि अश्लील कृत्य करतानाचेही व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
नक्की घडलं तरी काय? जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video of couple kissing on car’s sunroof)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर एक व्हिडीओ तुफान (Viral Video of couple kissing on car’s sunroof) व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये घडलेली घटना लखनऊमधील आहे. या व्हिडीओत एक जोडपं चालत्या कारच्या सनरूफवर एकमेकांना किस करताना दिसतंय. त्याचबरोबर त्यांचे अश्लील चाळेदेखील सुरूच आहेत.
हा व्हिडीओ ‘Anujjournalist9889’ या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘लखनऊ : संस्कृती आणि शिष्टाचाराचे शहर गोमतीनगरसारखा भाग आता बदनाम होतोय. दंगलीनंतर प्रेमी युगुलांची अश्लीलता चव्हाट्यावर आली; १०९० चौक ते मुख्यमंत्री चौकापर्यंत हे कपल बिनधास्तपणे हे अश्लील कृत्य करीत राहिले. त्या वेळेस पोलिस गैरहजर होते. हे कृत्य UP 78 GB 0130 क्रमांकाच्या कारच्या सनरूफवर घडत होतं’, असं कॅप्शन या व्हिडीओला (Viral Video of couple kissing on car’s sunroof) देण्यात आलं आहे.
या प्रकरणावर आता लखनऊ पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि आश्वासन दिले आहे की, तपास केला जात आहे आणि या प्रकरणाच्या संदर्भात आवश्यक पावले उचलली जातील.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल (Viral Video of couple kissing on car’s sunroof) होताच अनेकांनी या कृतीचा निषेध केला आहे; तर काही जण या कृतीला समर्थन देतानादेखील दिसत आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “यामध्ये काहीही चुकीचं नाही. तुम्ही तुमची मानसिकता बदला.”
हे पण वाचा
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार