छत्रपती संभाजीनगर :- विहिरीत पडून ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. बदला आणि संपत्तीसाठी सख्ख्या काकूनेच चिमुकल्या पुतण्याचा जीव घेतल्याची बाब समोर आलीय.काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माटेगावात चार वर्षाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. खेळताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या बालकाचा त्याच्या सख्ख्या काकूनेच बदला आणि संपत्तीच्या हव्यासापोटी खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झालीय.
सुनीता गणेश जाधव असे काकूचे नाव असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.माटेगाव येथील गट नंबर 17 मधील शेत वस्तीवर गणेश हिरामण जाधव आणि सागर हिरामण जाधव हे दोघे भाऊ एकत्र राहतात. या दोघांना वडिलोपार्जित 6 एकर जमीन आहे. मोठा भाऊ गणेश यांच्या पत्नीचे नाव सुनीता असून त्यांना 2 मुले आहेत तर लहान भाऊ सागर यांना 1 मुलगा आणि मुलगी आहे. काही दिवसापूर्वी सागर यांचा मुलगा सार्थक याने खेळताना गणेशच्या मुलाच्या डोळ्यात चुना टाकला होता.त्यामुळे त्याचा डोळा निकामी झाल्याने त्याचा प्रचंड राग सूनिताच्या मनात होता. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच सागरच्या पत्नीचे ऑपरेशन काढून तिची गर्भ पिशवी काढून टाकण्यात आली म्हणजे भविष्यात तिला मूलबाळ होणार नाही याची जाणीव सुनीताला आली आणि तिने सार्थकची हत्या केली.
संपत्तीसाठी सुनेचे निर्दयी कृत्य
संपत्तीसाठी सून आपल्या वृद्ध सासूला जबर मारहाण करत असल्याची घटना सुरतमध्ये घडली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुजरातमधील सुरत शहरातील हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं होतं. घरात सून सासूला पकडून मारहाण करत आहे. धक्कादायक म्हणजे या भांडणात सून सासूचे केस ओढत तिचे गाल चावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.