हैदराबाद :- मुलीला वाचवायला मध्ये पडलेल्या आई-वडिलांचीच जावयाने हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. बनोथू श्रीनू आणि सुगुणा अशी हत्या झालेल्या जोडप्याची नावे आहेत. पत्नी माहेरी येऊन राहत असल्याच्या रागातून पती तिच्या हत्येच्या उद्देशाने सासरवाडीत आला होता.मात्र मुलीला वाचवायला आलेल्या आई-वडिलांनाच जीव गमवावा लागला. तर मुलगी आणि मुलगा जखमी झाले आहेत. वारंगल पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. मेक्काला नागाराजू असे आरोपीचे नाव आहे.
नागाराजू आणि दीपिका यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रेमविवाह झाला होता. नागाराजू हा रिक्षाचालक आहे. नागाराजूच्या रिक्षातून प्रवास करताना त्याची दीपिकासोबत ओळख झाली. मग दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले. पण दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने दीपिकाच्या पालकांचा लग्नाला विरोध होता. दोघेही लग्नानंतर हैदराबाद येथे राहत होते. लग्नानंतर दोन महिन्यांतच दीपिकाचे मत बदलले आणि ती नागाराजूला सोडून माहेरी आली. दीपिका सोडून गेल्याने नागाराजू अस्वस्थ होता.
याच रागातून त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला. बुधवारी रात्री नागाराजू आपल्या सासरवाडीत आला. यावेळी घराच्या बाहेरच्या बाजूला दीपिकाचे आई-वडील झोपले होते.राजू हातात चाकू घेऊन दीपिकाच्या घरी आला. तो दीपिकाला घरी शोधत असतानाच तिच्या आई-वडिलांना जाग आली. यावेळी नागाराजूसोबत त्यांची झटापट झाली. नागाराजून दोघांवर चाकूने वार केले. यात सुगुणाचा जागीच मृत्यू झाला तर श्रीनूचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नागाराजू याने दीपिका आणि तिच्या भावावरही हल्ला केला. मात्र घरातील आरडोओरडा ऐकून शेजाऱ्यांना जाग आली. शेजाऱ्यांनी दीपिकाच्या घराकडे धाव घेताच नागाराजूने तेथून पळ काढला. यामुळे दीपिका आणि तिच्या भावाचे प्राण वाचले. वारंगल पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.