नेपाळमध्ये काठमांडूला जातांना पर्यटक बस नदीत कोसळल्याने भुसावळ तालुक्यातील 14 भाविकांच्या मृत्यू.

Spread the love

पोखराहून काठमांडूला जाणारी भारतीय पर्यटक बस मुखलिसपूरजवळ नदीत कोसळल्याची घटना घडलीय. गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हल बसमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ४३ प्रवासी प्रवास करत होते. गोरखपूरमधील चालकासह १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.केसरवाणी ट्रॅव्हल्स, गोरखपूर येथून बुक केलेल्या बसमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ४३ पर्यटक होते.

सर्व प्रवासी नदीत वाहून गेल्याची माहिती आहे. आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, तरंग चौकाजवळ असलेल्या कार्यालयात चारू नावाच्या महिलेने केसरवाणी ट्रॅव्हलच्या दोन बस आणि एक ट्रॅव्हलर गाडी पर्यटनासाठी बुक केलं. येथून सर्व गाड्या प्रयागराज रेल्वे स्थानकावर पाठवण्यात आल्या, तेथून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ११० पर्यटकांचा गट चित्रकूटला गेला होता. तेथून अयोध्या आणि लुंबिनीमार्गे नेपाळमधील पोखरा येथे पोहोचले.

आज सगळे काठमांडूला जाणार होते. त्याच दरम्यान त्यांचा अपघात झाला.बस मुखलिसपूरजवळ आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यानंतर बस दरीत कोसळली या बसमध्ये ४३ जण होते. या अपघातात गोरखपूरचा पिपराइच, चालक मुर्तुजा उर्फ मुस्तफा, रहिवासी भगवानपूर (तुरवा) आणि भुसावळ तालुक्यातील १४ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये बस दरीत कोसळल्याची माहिती मिळाली असून यासंदर्भातील अधिकची माहिती संकलित करण्यात येत आहे.

चारू नावाच्या महिलेने गोरखपूरमधील तरंग चौकातील केसरवाणी ट्रॅव्हल्स कार्यालयात ट्ररिस्ट बस बूक केली होती होती. सर्व लोक प्रयागराजमधून बसमध्ये बसले होते. येथे ते चित्रकूटला गेले त्यानंतर ते इतर पर्यटस्थळावर गेल्या माहिती मिळालीय. अपघात होण्यापूर्वी सर्व प्रवासी नेपाळच्या दिशेने निघाले होते. पर्यटकांची बस पोखरातून काठमांडूला निघाली होती. स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी अबू खैरेनी घटनास्थळी पोहोचलेत.

बसमधील प्रवाशांची नावे

अनंत ओंकार इंगळे
सीमा अनंत इंगळे
सुहास राणे
सरला राणे
चंदना सुहास राणे
सुनील जगन्नाथ धांडे
निलीमा सुनील धांडे
तुळशीराम बुधो तायडे
सरला तुळशीराम तायडे
आशा समाधान बावस्कार
रेखा प्रकाश सुरवाडे
प्रकाश नथु सुरवाडे
मंगला विलास राणे
सुधाकर बळीराम जावळे
रोहिणी सुधाकर जावळे

विजया कडू जावळे
सागर कडू जावळे
भारती प्रकाश जावळे
संदीप राजाराम सरोदे
पल्लवी संदीप सरोदे
गोकरणी संदीप सरोदे
हेमराज राजाराम सरोदे
रुपाली हेमराज सरोदे
अनुप हेमराज सरोदे
गणेश पांडुरंग भारंबे
सुलभा पांडुरंग भारंबे
मिलन गणेश भारंबे
परी गणेश भारंबे
शारदा सुनील पाटील
कुमुदिनी रविंद्र झांबरे
शारदा सुनील पाटील
निलीमा चंद्रकांत जावळे
ज्ञानेश्वर नामदेव बोंडे
आशा ज्ञानेश्वर बोंडे
आशा पांडुरंग पाटील
प्रवीण पांडुरंग पाटील
सरोज मनोज भिरुड
पंकज भागवत भगाळे
वर्षा पंकज भंगाळे
अविनाश भागवत पाटील
अनिता अविनाश पाटील
मुर्तीजा (ड्रायव्हर)
रामजीत (वाहक).

जखमी स्थानिक रुग्णालयात दाखल

नेपाळच्या स्थानिक माहितीनुसार, या अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एसएसपी माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली नेपाळ लष्कराचे पथक, सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे.

बस नदीत कशी पडली?

बस अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात पाठवले. बस नदीत कशी पडली? त्याचा कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून मदतकार्याला प्राधान्य दिले आहे.

मंत्री अनिल पाटील यांची माहिती

दरम्यान, पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त (रिलीफ कमिश्नर) यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे. अपघातावेळी ११० पर्यटकांच्या तीन बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होत्या. त्यापैकी ४१ जण प्रवास करत असलेली बस नदीत कोसळली.

टीम झुंजार