केकडी (राजस्थान) :- प्रेमामध्ये कोण काय करेल हे सांगणे फार जास्त कठीण आहे. अशी एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. चुलत बहिणीनेच आपल्या बहिणी हत्या केली.समज देऊनही बहिण ऐकत नसल्याने अखेर दुसऱ्या बहिणीने आपल्या रस्त्यातील काटा काढत चुलत बहिणीची हत्या केली. घडलेली संपूर्ण घटना ऐकल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. विशेष म्हणजे पोलिसांनी तीन तासांमध्ये हत्येचे रहस्य उघड केले.
राजस्थानमधील केकडी येथे हैराण करणारी घडना घडलीये. हे सर्व प्रकरण प्रेम प्रकरणातून घडल्याचे उघडकीस आले. दोन्ही चुलत बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या. आरोपी तरुणी मृत बहिणीला सतत आपल्या बॉयफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगत होती. मात्र, काहीही करून बहिणी आपल्या बॉयफ्रेंडपासून दूर राहत नसल्याचे आरोपी बहिणीच्या लक्षात आले.आरोपी बहिणीने पोलिसांना सांगितले की, मी तिला शंभर वेळा सांगितले होते की, माझ्या बॉयफ्रेंडपासून दूर राहा. पण तिला समजतच नव्हते.
मी नसताना ती सतत माझ्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. हेच नाही तर त्याच्याशी जवळीकता वाढवत होती. घरामध्येही ती यावरून मला बोलत होती. मला तिला मारायचे नव्हते, पण मी तिला काय सांगत होते ते तिला कळतच नव्हते. गुरुवारी आम्ही दोघी नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी शेतात गेलो होतो. यावेळी आमच्या दोघींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद झाला. ती माझे अजिबातच ऐकत नव्हती. यावेळी माझा राग इतका जास्त अनावर झाला की, मी काठीने तिला मागून जोरात मारले आणि लगेचच ती जमिनीवर पडली.
नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती ही आरोपी बहिणीने दिलीये.या प्रकारानंतर यांच्या घरच्यांचा पायाखालची जमिन सरकली आहे. हेच नाही तर पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये गुन्हा कबुल करून घेतलाय. मात्र, प्रेमासाठी दोन्ही बहिणी कोणत्या टोकाला गेल्या याची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये एक चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






