पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओ काढले.तसेच फिर्यादीकडून तिच्या आईचे २० लाख ६६ हजार ८२० रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन परत करण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरात दागिने नसल्याचे लक्षात येताच हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.याप्रकरणी एका १५ वर्षीय मुलीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी हर्ष महेंद्र महाडिक (वय-२१, रा. गोकुळनगर, कात्रज-याच्याविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सॅलेसबरी पार्क, मार्केटयार्ड, कल्याणीनगर येथील हॉटेलमध्ये ११ डिसेंबर २०२२ पासून १० जुलै २०२४ दरम्यान घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हर्ष महाडिक यांचे प्रेमसंबंध होते. त्यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पार्ट्या देखील केल्या आहेत. त्यावेळी आरोपी हर्ष याने आपल्यावर खूप कर्ज झाले आहे.
ते फेडण्यासाठी काही तारण ठेवावे लागणार असल्याचे मुलीला सांगितले. फिर्यादी हिने आईच्या नकळत तिचे दागिने एक-एक करुन हर्षच्या हवाली केले. अशा प्रकारची कारणे देऊन हर्षने तिच्याकडून आईचे २० लाख ६६ हजार ८२० रुपयांचे दागिने घेतले.दरम्यान, काही दिवसांपूर्वी घरात दागिने नसल्याचे आईच्या लक्षात आल्याने तिने फिर्यादी मुलीला विचारले असता तिने आपण हर्षला सर्व दागिने दिल्याचे सांगितले. फिर्यादीने दागिने परत मागितल्यावर हर्ष याने फिर्यादीच्या बोटाला चावा घेऊन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






