यावल :- तालुक्यातील एका गावामध्ये ३६ वर्षीय महिला परिवारासह रहात असून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. ही महिला शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता एका शेत शिवारामध्ये शौचालयासाठी गेली होती. त्यावेळेला तिथे संशयित आरोपी विनोद दोधू मेढे हा आला. त्याने महिलेचा विनयभंग करून तिला यावल तालुक्यातील एक ३६ वर्षीय विवाहित महिला शेत शिवारामध्ये शौचालयात गेली असता
एका संशयित आरोपीने तिचा विनयभंग करून केळीच्या शेतात ओढत नेउन तिच्यावर बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो काढले. व ते विवस्त्र फोटो पिडीत महिलेच्याच नणंदेच्या मदतीने व्हायरल केले. फैजपूर पोलीस स्टेशनला या संदर्भात विनोद मेढे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच्या केळीच्या शेतात ओढत नेले. त्या ठिकाणी तिला पूर्ण विवस्त्र करून तिचे फोटो काढून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला नकार देताच त्यानी तिच्यावर जबरीने बलात्कार केला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
इतकेच नव्हे तर विनोद मेढे याने पिडीत महिलेचे विवस्त्र फोटो काढून पिडीत महिलेची नणंद हिच्याकडे पाठवले. तिने ते फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल केले. या संदर्भात पीडित महिले ने फैजपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता विनोद दोधू मेढे याचेवर फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मैंनुद्दीन सय्यद हे करीत आहेत.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






