चाळीसगाव : चारित्र्यावर संशय घेत तोंडात बोळा कोंबून दोरीने गळा आवळून पतीने पत्नीचा खून केला, तर पतीने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळोंदे प्र. दे.(ता. चाळीसगाव) येथे घडली. मृत पतीविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तळोंदे प्र. दे. (ता. चाळीसगाव) शिवारात एका इसमाने गळफास घेतल्याची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी कर्मचारी अशोक राठोड व संजय लाटे यांना घटनास्थळी पाठविले. शिवाजी पाटील (रा. पिंप्री बुद्रुक प्र. दे.) यांच्या तळोंदे प्र. दे. शिवारातील शेतातील खोलीमध्ये गोपाल सत्तरसिंग पावरा ऊर्फ बारेला (वय ३०) याने गळफास घेऊन त्याची पत्नी लक्ष्मीबाई (वय २६) हिच्या तोंडात कापडाचा बोळा देवून तिचा दोरीने गळा आवळल्याचे त्यांना आढळून आले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, उपनिरीक्षक विकास शिरोळे, प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, हनुमंत वाघेरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुरवातीला शेतमालक शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. दोघी मृतदेहांचे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. उपनिरीक्षक विकास शिरोळे यांनी मृत नातेवाइकांचे जाबजबाब घेतले. त्यात मृत गोपाल बारेला लक्ष्मीबाईच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ, मारहाण करीत होता व मारण्याची धमकी देत होता.
त्यावरून गोपालने पत्नी लक्ष्मीबाई हिच्या दोरीने गळा आवळून खून केला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असे नातेवाइकांनी सांगितले. उपनिरीक्षक विकास शिरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृत गोपाल पावरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.संशयाचे भूत अन् पत्नीचा खूनतळोंदे प्र. दे. भागात मागील वर्षी शिवानी राजेश पावरा (वय २५) यांचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने खून केला होता. आता लक्ष्मीबाई पावरा यांचा खून झाला. संशयाचे भूत माणसाच्या डोक्यात घुसले, की सुखी संसाराची कशी राखरांगोळी होते, याचे उदाहरण या घटनांतून समोर आले आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






