पाचोरा :- दहीहंडी फोडताना पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज (दि.28) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे घडलीये. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे पाचोऱ्याचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळला
काल गोकुळाष्टमी पार्शवभूमीवर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेस पाचोरा शहरात स्टेशन रोड वरील रिक्षा स्टॉपवर देखील काही रिक्षा चालकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. काल रात्रीच्या सुमारास ही दहीहंडी फोडण्यासाठी नितीन चौधरी हा रिक्षा चालक गोविंदाने पुढाकार घेतला. मात्र दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला होता.
मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी
त्याला तातडीने रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नितीन चौधरी हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता गेल्याने या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर झालाय. मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम