जळगाव : शहराकडे जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात विवाहितेसह १७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी आहे.ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२८) मानराज पार्कजवळ दुपारी दोनच्या सुमारास घडली. दिक्षिता राहूल पाटील (वय २७) व पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर (वय १७) अशी मृतांची नावे आहेत तर रूद्रा राहूल पाटील (वय ३) हा चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वाटिकाश्रम येथील द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही मुलगी परिवारासह राहते. याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील ही विवाहिता आपल्या माहेरी आली होती. या अपार्टमेंटमध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता. त्यामुळे त्या मुलाला पहाण्यासाठी दिक्षिता पाटील ही विवाहित महिला आपल्या मुलासह पायल जलंकर हिच्यासोबत बुधवारी दुपारी (क्र. एम एच १८ ए एस ५३७९) या दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली होती.
खोटे नगरकडून शहराकडे दुचाकीने जात असतांना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक देवून दोघांना चिरडल्याने पायल जंलकर व दिक्षिता पाटील या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर रूद्र हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला . या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.