मुजफ्फरपूर :- प्रेमप्रकरणातून एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडचा निर्घृण खून केला. तिने त्याला इतका भयंकर मृत्यू दिला की कोणालाही ऐकून धक्का बसेल. सहजानंद कॉलनीत दोन दिवसांपूर्वी गोणीत भरलेला मृतदेह आढळला होता.या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मृताचं नाव जयप्रकाश असून त्याचा खून त्याच्या गर्लफ्रेंडने केला. या खुनात तिचे कुटुंबीय सहभागी आहेत. तिने खोटं बोलून त्याला गोव्यातून मुजफ्फरपूरला बोलावलं होतं. इथे आल्यावर ती त्याला नाश्ता करायला घेऊन गेली आणि मग मामेभावाच्या भाड्याच्या खोलीत घेऊन गेली. तिथे वडील, मामेभाऊ, सख्खा भाऊ आणि भावोजींच्या मदतीने तिने त्याचा खून केला.
बिहारमधल्या मुजफ्फरपूरमध्ये हे भयंकर हत्याकांड घडलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या भावाने आधी जयप्रकाशचा गळा चिरला, नंतर त्याच्या पोटातून आतडं बाहेर काढलं. यानंतर तो चाकूने त्याच्या शरीरावर वार करत राहिला. जयप्रकाशच्या मृत्यूनंतर सर्वांनी मिळून मृतदेह एका गोणीत भरून खोलीत ठेवला. यानंतर मृतदेह सायकलवर ठेवून घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी बुऱ्हानपूरला राहणारा मुलीचा मामेभाऊ रवींद्र महतो याला अटक केली आहे. चौकशीवेळी रवींद्रने घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली. मुलगी, तिचे वडील, सख्खा भाऊ आणि भावोजी फरार आहेत. जयप्रकाशची गर्लफ्रेंड त्याच्या मामे-बहिणीची नणंद आहे.
नात्यात दुरावा, गर्लफ्रेंडने लग्नाला दिला नकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबगंजचा रहिवासी जयप्रकाश आणि त्याची गर्लफ्रेंड यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान ती बीपीएससीच्या तयारीसाठी पाटण्याला गेली होती. काही महिन्यांनी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि तिने जयप्रकाशशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर दोघांमधलं बोलणं कमी झालं. जयप्रकाश तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता; पण ती ऐकत नव्हती. दरम्यानच्या काळात जयप्रकाशच्या मोठ्या भावाने त्याला गोव्यात इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी मिळवून दिली. यानंतर तो गोव्याला कामासाठी निघून गेला.
आक्षेपार्ह फोटो गर्लफ्रेंडच्या नातेवाईकांना पाठवले
पोलीस तपासानुसार, गर्लफ्रेंड आजारी पडल्यावर तिचा सर्व खर्च जयप्रकाशने उचलला होता. त्यानंतरही त्याने तिला अनेक वेळा पैसे दिले होते. आपली गर्लफ्रेंड आपली फसवणूक करत असल्याचा संशय त्याला आला होता. ती आता दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याचं त्याला कळलं. त्यानंतर दोघांमधला वाद वाढला. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्याशी बोलणंही बंद केलं होतं.
गर्लफ्रेंडने धोका दिल्याने जयप्रकाश नाराज होता. दोघं एकमेकांशी बोलत नव्हतं. जयप्रकाशकडे गर्लफ्रेंडसोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ होते. ते त्याने तिच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गर्लफ्रेंडने बदला घेण्यासाठी जयप्रकाशच्या खुनाचा कट रचला.
गर्लफ्रेंडने मर्डरचा प्लॅन कसा केला?
मुलीच्या मामेभावाने चौकशीत पोलिसांना सांगितलं की त्याची बहीण जयप्रकाशचा खून करण्याच्या उद्देशाने त्याला सतत फोन करून बोलवत होती; मात्र तो येत नव्हता. नंतर तिने जयप्रकाशला लग्नाचं आमिष दाखवलं. तिने त्याला म्हटलं की तो मुझफ्फरपूरला आल्यावर ती त्याच्याशी लग्न करील; मात्र जयप्रकाशला आपला खून होऊ शकतो, अशी भीती वाटत होती. कारण त्याला धमक्या येत होत्या. तरीही तो गोव्याहून मुझफ्फरपूरला आला. इथे आल्यावर तो सर्वांत आधी भगवानपूर इथल्या भावाच्या भाड्याच्या घरी गेला आणि नंतर तिथून गर्लफ्रेंडला भेटायला गेला.
आधी हॉटेल, नंतर रूमवर घेऊन गेली गर्लफ्रेंड मग…
मुझफ्फरपूरला पोहोचल्यानंतर जयप्रकाश गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी भगवानपूरच्या एका हॉटेलमध्ये गेला. तिथे दोघांनी एकत्र नाश्ता केला. त्यानंतर गर्लफ्रेंडने त्याच्या मामेभावाच्या खोलीवर जाण्यास त्याला तयार केलं, त्याने सर्व व्यवस्था केल्याचं सांगितलं. दोघंही तिथे पोहोचले. यादरम्यान, मुलीने तिच्या कुटुंबीयांना फोन करून जयप्रकाश खोलीत आल्याची माहिती दिली. खोलीत सर्वांनी मिळून त्याची हत्या केली.
ऑडिओ क्लिप सापडली
जयप्रकाश आणि त्याच्या गर्लफ्रेंडमधल्या संभाषणाच्या काही ऑडिओ क्लिपही कुटुंबीयांनी पोलिसांना दिल्या आहेत. यामध्ये ती जयप्रकाशला लग्न करण्यासाठी मनवत आहे. मुझफ्फरपूरला पोहोचल्यावर लग्न करणार असंही ती म्हणत आहे. जयप्रकाश म्हणतो, की ‘तू फोन बोलवतेय, पण मारून टाकशील तर…?’ यावर मुलगी त्याला मनवते. जयप्रकाशचा मृतदेह 14 ऑगस्ट रोजी सहजानंद कॉलनीतल्या 9 नंबरच्या गल्लीत पोत्यात भरलेला सापडला होता. जयप्रकाशची आई रंभा देवी यांनी आपल्या मुलाची गर्लफ्रेंड, वडील, भाऊ आणि मेव्हण्यावर खुनाचा आरोप करून तक्रार दिली होती.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४