झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- येथे दि. 6/04/2022 वार बुधवार एरंडोल येथील शासकीय विश्रामगृहात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आयु रामदासजी आठवले साहेब याच्या आदेशाने तसेच उतर महाराष्ट्र प्रमुख आदरणीय आयु. रमेश जी मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. आगामी होऊ घातलेल्या जि.प./ प.स./न.प.व नगर पंचायत निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली की मित्र पक्ष भारतीय जनता पार्टी यांनी राखीव जागेवर रिपाईला संधी द्यावी असा ठराव करण्यात आला तसेच बैठकीत विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच तालुका कार्यकारणी नवीन घोषित करण्यात आली व नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेश करण्यात आला यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नंतर पंचायत समिती एरंडोल तहसील कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय एरंडोल येथे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीवेळी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाचे सरचिटणीस गजानन पाटील यांचे अध्यक्ष ते खाली बैठक संपन्न झाली रिपाईचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर तालुका सचिव देवानंद बहिरे तालुका सल्लागार सिताराम मराठी तालुका संघटक देविदास जाधव तालुका उपाध्यक्ष सुनील खोकरे कोषाध्यक्ष भाऊराव गायकवाड कासोदा शहराध्यक्ष मन्सूर पठाण कासोदा उपाध्यक्ष समसुद्दिन शेख नाद दादा सलीम भाई मुन्नाभाई शोयब मुजफ्फर अली इतर पदाधिकारी उपस्थित होते.