एमबीबीएस च्या तृतीय वर्षाची विद्यार्थीनीचा चार मजली इमारतीवरून पडून मृत्यू, आत्महत्या की अपघात? तपास सुरू.

Spread the love

छिंदवाडा : – मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पारसिया रोडवरील त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (16 ऑगस्ट) रात्री 11.30 वाजता घडली.या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला.

संशयास्पद मृत्यू –

मृत तरुणी वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात येत आहे. आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की तिने स्वतः उडी मारली की अनियंत्रितपणे पडली की तिला कोणीतरी ढकलले? पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वडिलांसोबत शेवटचा चित्रपट पाहिला, मग…

मृतक तेजस वासनिक ही तरुणी तिचे वडील विनोद वासनिक यांच्यासोबत पारसिया रोडवरील त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहत होती. दोन महिन्यांपूर्वी रजेवर ती वडिलांसोबत छिंदवाडा येथे आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, च्या रात्री विनोद आपल्या मुलीसोबत फ्लॅटमध्ये होते.रात्री वडील आणि मुलीने एकत्र जेवण केले आणि चित्रपट देखील पाहिला. रात्री दहाच्या सुमारास वडील झोपायला गेले. सुमारे 20-25 मिनिटांनंतर विनोद यांना शेजाऱ्यांचा फोन आला की त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे.

वडिलांनी तत्काळ खाली जाऊन तीला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विनोद हे कोळसा खाणीत अधिकारी आहेत. तेजसची आई ममता वासनिक यांचे 2004 मध्ये निधन झाले होते. ममता वासनिक या परासिया येथील डॉक्टर होत्या.

हे पण वाचा

टीम झुंजार