अकोला :- बदलापूरची घटना ताजी असताना अकोल्यात पुन्हा: एकदा सर्वांना हदरवून सोडणारी घटना घडली आहे. ही घटना इतकी भयंकर आहे की तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्या शिवाय राहाणार नाही. इथल्या एका 10 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्याच नराधम बापाने अत्याचार केलेत.ऐवढेच नाही तर तिच्या मामानेही तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणाचा तपास करत असतानाच तिच्या बापानंही तिचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. इयत्ता दुसरीत असल्यापासून तिचे शोषण होत होते.
या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.मनात चिड निर्माण करणारी ही घटना अकोल्यात घडली आहे. 24 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता. याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती. आई वडील गावाला निघून गेल्याने त्यांनी पिडीत मुलीला आपल्या नातेवाईकांकडे ठेवले होते. त्याच वेळी तिच्या मामाने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपास सुरू झाला. शिवाय मुलीचा बाल न्याय मंडळासमोर जबाबही नोंदवला गेला.
ज्या वेळी हा जबाब नोंदवला जात होता त्यावेळी आणखी एक धक्कादायत माहिती समोर आली. मामाने अत्याचार केलाच. पण ज्यावेळी पिडीत मुलगी ही दुसऱ्या इयत्तेत शिकत होती तेव्हा पासून वडीलही आपल्यावर अत्याचार करत होते. अशी धक्कादायक माहिती तिने जबाब नोंदवताना दिली. तिने दिलेल्या या जबाबानंतर न्याय मंडळा बरोबरच पोलीसही हादरून गेले. त्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.या प्रकरणी पिडीत मुलीचा मामा आणि तिच्या नराधम बापाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार अमोल मिटकरी यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. शिवाय या प्रकरणातील आरोपींनी कडक शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली. त्याच बरोबर या प्रकरणाची सुनावणी बदलापूर प्रकरणा प्रमाणे जलदगती न्यायालया समोर व्हावी असी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान याबाबत ठाणे प्रभारी विजय चव्हाण दोषींनी पकडले असल्याची माहिती दिली आहे.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४