एरंडोल :- शहरासह ग्रामीण भागात शेकडो गणेश मंडळांनी गणेशाची उत्साहात स्थापना केली.सकाळी दहा वाजेपासून स्थापना मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली होती.रात्री उशिरापर्यंत स्थापना मिरवणूक सुरु होती.गणेशोत्सवानिमित्त शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.सकाळपासूनच गणेशाची
मूर्ती व पूजेचे साहित्य करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.शहरात अठरा सार्वजनीक तर सुमारे ऐंशी लहान गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली.ग्रामीण भागात देखील शेकडो गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली.
शहरात सकाळी दहा वाजेपासूनच गणपतीच्या स्थापना मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली होती.जयगुरु व्यायाम शाळा,सावता माळी व्यायाम शाळा,बालवीर मित्र मंडळ,नागराज मित्र मंडळ,बालमित्र गणेश मंडळ, सर्वोदय गणेश मंडळ, ज्ञानदीप मित्र मंडळ,श्रीराम गणेश मंडळ,चौक गणेश मित्र मंडळ,पांडववाडा मित्र मंडळ, माहेश्वरी नवयुवक गणेश मंडळ,छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, श्री संताजी गणेश मित्र मंडळ, हरीपुरी युवक मित्र मंडळ, अखिल ब्रह्मवृंद युवक मंडळ,चौक मित्र मंडळ,जय बजरंग मित्र मंडळ,बालाजी मित्र मंडळ यासह अन्य प्रमुख सार्वजनिक व लहान गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत होते.स्थापना मिरवणूक सुरु असतांना पावसाचे आगमन झाल्यामुळे गणेशाच्या मुर्त्या प्लास्टिक कागदांनी झाकण्यात आल्या होत्या. स्थापना मिरवणूक सुरु असतांना शहरातील अनेक भागात सुमारे चार तास वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.सकाळी आठ वाजेपासूनच गणेशाची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.यावर्षी सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी सुमारे पंधरा ते वीस फुट उंचीच्या मूर्तींची स्थापना केली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थापना मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस गर्दी केली होती.राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकारी स्थापना मिरवणुकीत सक्रीय सहभागी झाले होते.सार्वजनिक गणेश मंडळांनी परिसरात सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.स्थापना मिरवणूक शांततेत पार पडली.मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिकेतर्फे बुजवण्यात आले होते.स्थापना मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांसाठी ठिकठीकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध कौन देण्यात आले होते. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४