आजचे राशी भविष्य सोमवार दि. ९ सप्टेंबर २०२४

Spread the love

आजच्या दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.
जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजच्या दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष: ( ९ सप्टेंबर २०२४)

खास मित्र आणि गुरुंच्या संपर्कात आजचा दिवस चांगला जाईल. कोणत्याही विपरित परिस्थितीला तुम्ही सामंजस्याने सामोरे जाल. तरुणांना एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. एखादी जवळची व्यक्ती आश्वासन देऊन ते मोडेल. त्यामुळे तुमचा रागा अनावर होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. प्रेमसंबंधात एखाद्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तात्काळ गैरसमज दूर करा. खाण्यावर नियंत्रण ठेा.

वृषभ: (९ सप्टेंबर २०२४)

आज आत्मपरिक्षण करण्याचा दिवस आहे. तुमच्या हट्टीपणामुळे आज मोठं नुकसान होऊ शकतं. आज मेहनत अधिक आणि लाभ कमी अशी तुमची स्थिती होईल. तणाव घेऊ नका. तणाव घेऊन समस्या सुटत नसतात. इन्कम टॅक्स आणि लोन आदींबाबत समस्या निर्माण होतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्या. ऑफिसात बॉसला अधिककाळ फसवू नका. कधी ना कधी चोरी पकडली जाईल. वर्क फ्रॉम होमचा फार आग्रह धरू नका, नाही तर अडचणीचं ठरेल.

मिथुन: (९ सप्टेंबर २०२४)

मागच्या चुकांपासून शिकून पुढे जाण्याचा हा काळ आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. अचानक होणाऱ्या धनलाभावर विसंबून राहू नका. आज कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण करू नका. नाही तर तुमचं नुकसान होईल. बिझनेसमध्ये तुमचा विश्वासघात होऊ शकतो. गळ्यात इन्फेक्शन होईल. त्यामुळे घसा दुखू लागेल. खोकल्याचा त्रास होईल. प्रेमसंबंधात एकमेकांच्या भावना जाणून घ्या. त्याचा सन्मान करा. ऑफिसमध्ये राजकीय वातावरणासारखं वातावरण राहील. त्यामुळे तुमच्या कामापुरतं काम ठेवा.

कर्क : (९ सप्टेंबर २०२४)

तरुणांना एखाद्या स्पर्धेत आज यश मिळू शकतं. एखाद्या व्यक्तीगत कामासाठी प्रवास घडण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रे चांगली चेक करून घ्या. तुमचा एखादा जवळचा व्यक्तीच तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे. कोणत्याही कठिण प्रसंगात स्वत:ला बाहेर काढण्यासाठी स्वत: प्रयत्न करा. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. वकिलांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा जाणार आहे. आर्थिक भरभराट होण्याची शक्यता आहे. नवीन केसेस मिळण्याचीही शक्यता आहे. प्रेमात अपयश येण्याची शक्यता आहे.

सिंह: (९ सप्टेंबर २०२४)

आज अत्यंत सावध राहा. आज तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामात कामचुकारपणा करण्याऐवजी लक्ष देऊन काम करा. तुम्हाला त्याचं शुभ फळ मिळेल. आज तुमच्या हातून एक मोठी संधी जाणार आहे. तुमच्या आळशी स्वभावामुळे ही संधी हुकणार आहे. नोकरीमध्ये टार्गेट पूर्ण करणाऱ्यांना सन्मान मिळण्याची शक्यता आहे. बायकोसोबत असलेला दूरावा दूर होईल. सर्व गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील.

कन्या: (९ सप्टेंबर २०२४)

पूर्वीपेक्षा आता आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे मनात आनंद राहील. घरात एखादं धार्मिक कार्याचं आयोजन केलं जाईल. घर किंवा वाहनाशी संबंधात मोठा खर्च करावा लागणार आहे. अनावश्यक गोष्टींमध्ये आज दिवस जाईल. त्यामुळे मित्र मंडळींना वेळ देऊ शकणार नाही. घरात सुख शांती राहील. प्रियकर आणि प्रेयसीमध्ये सामंजस्य वाढेल. त्यांच्यातील प्रेम अधिक वृद्धिंगत होईल. गावाकडे जाण्याचा योग आहे. कोर्टकचेरीची कामे मार्गी लावा. पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ येऊ शकते. लोकलमधून प्रवास करताना कुणाशीही वाद घालू नका.

तूळ: (९ सप्टेंबर २०२४)

आजचा दिवस मनाजोगा आहे. सिनेमाला जाण्याचा बेत आखाल. सासूरवाडीकडील वाद आज संपुष्टात येईल. शुल्लक कारणावरून शेजाऱ्याशी वाद घालाल. शेजारणीशी कडाक्याचं भांडण होईल. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक देवाणघेवाण करताना जपून. नाही तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रदूषणाच्या ठिकाणी आणि धांगडधिंगा असलेल्या ठिकाणी जाऊ नका. नाही तर त्रास होईल. खोकला, सर्दी होण्याची शक्यता आहे. नवरा-बायकोदरम्यान सामंजस्य राहील.

वृश्चिक: (९ सप्टेंबर २०२४)

अडकलेला पैसा अचानक मिळाल्याने अनेक कामे मार्गी लागतील. समस्या सोडवण्यावर आज भर द्या. नाही तर अडचणी वाढतील. कोर्टाच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर अडचणीत याल. आजचा दिवस अत्यंत कडकीचा जाणार आहे. प्रेयसीसोबत डेटिंगला जाण्याचा बेत रद्द कराल. दिवसभर आळसावलेली स्थिती राहील. ऑफिसमध्ये जोरदार भांडणं होतील. घरात बायकोशी कडाक्याचं भांडण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. मुलीला अचानक सरप्राईज द्याल.

धनु: (९ सप्टेंबर २०२४)

एखादा कौटुंबीक वाद असेल तर वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन तो सोडवा. कोणतंही खास कार्य हाती घेताना त्याचा चोहोबाजूने विचार करा. त्याचा उचित परिणाम मिळेल. ऑफिसमधील तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. आरोग्याच्या बाबतीत टंगळमंगळ करू नका. नाही तर तब्येत खालावेल. आज घरातून बाहेर पडताना वाहन घेऊन जाऊ नका. नाही तर वाहतूक कोडींत अडकून पडाल. आजचा संपूर्ण दिवस धार्मिक कार्यात जाणार आहे. मित्रांच्या घरी सदिच्छा भेट द्याल.

मकर: (९ सप्टेंबर २०२४)

सोशल मीडियावर तास न् तास राहण्याची सवय सोडा. नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. कमी बजेटमध्ये आज जास्तीत जास्त खरेदी करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आज अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. पण कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. कुणालाही आज उधार देऊ नका. ऑफिसमध्ये अधिक कामाचा लोड येईल. त्यामुळे दिवसभर ऑफिसच्या कामात व्यस्त राहाल. डोळ्याचा त्रास जाणवेल. अंधूक दिसायला लागेल.

कुंभ: (९ सप्टेंबर २०२४)

एखाद्या गोष्टीचा अधिक हट्ट धरल्याने मोठी संधी हातातून जाऊ शकते. आज तुमच्यासोबत असंच होणार आहे. त्यामुळे हट्ट धरू नका. पेशन्स ठेवा. कोणताही निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना मुलाखतीची अधिक तयारी करावी लागणार आहे. घरात सामंजस्याचं वातावरण ठेवा. जुन्या मित्राची अचानक भेट होईल. आज तुम्हाला दु:खाची बातमी कळण्याची शक्यता आहे. जुने आजार डोकं वर काढतील. अशावेळी तात्काळ डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्या.

मीन: (९ सप्टेंबर २०२४)

आज व्यक्तीगत किंवा कौटुंबिक समस्येवर तोडगा निघणार आहे. तुमच्या जीवनशैलीत बदल करा. सुटलेलं पोट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त चालण्यावर भर द्या. नाही तर दम लागू शकतो. वादग्रस्त प्रकरणात डोकं घालू नका. इतरांच्या प्रकरणाशी संबंध ठेवून डोक्याला ताप करून घेऊ नका. कोणताही कागद वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका. परदेशातून आलेल्या मैत्रीणीकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. फक्त थोडासा थकवा जाणवणार आहे.

(या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

हे पण वाचा

टीम झुंजार