चाळीसगाव कन्नड रोडवर बस-दुचाकीचा भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांचा दुर्देवी मृत्यू.

Spread the love

कन्नड : एक वाजण्याच्या सुमारास कन्नड चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरीजवळ बस व दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला.

या विषयी अधिक माहिती अशी की, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आदित्य शेखर राहिंज (वय १७ वर्ष) व ओम श्रावण तायडे (वय २३ वर्षे) दोघे राहणार पोलीस कॉलनी हे दोघे स्कुटी क्र एमएच २० एफओ ९१९९ वरून अंधानेरकडे जात होते.

तर समोरून कन्नडकडे येणारी कन्नड आगाराची वडनेर कन्नड बस एमएच २० बीएल ०८८३ ही अंधानेरकडून कन्नड कडे येत होती. यावेळी या दोन्ही वाहनांची धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की, स्कुटी सरळ बसखाली गेली. यावेळी सहा. फौजदार जयंत सोनवणे व पोकॉ. दिनेश खेडकर यांनी नागरिकांच्या मदतीने बसखालुन गंभीर जखमींना बाहेर काढले. आदीत्य राहींज हा जागीच ठार झाला होता तर ओम तायडे हा गंभीर जखमी होता. त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

दोन पोलीस पुत्रांचा आपघात झाल्याचे कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, शहर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सपोनि कुणाल सूर्यवंशी, ग्रामीण सपोनि रामचंद्र पवार तसेच पोलीस कॉलनीतील महिला मुलांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. झालेल्या दुर्घटनेमुळे पोलीस कॉलनीसह पोलीस अधिकारी, कर्मचारी शोक व्यक्त करत आहे.

याच रोडवर दि. ७ रोजी ट्रक-दुचाकीचा आपघात झाला होता. यामध्ये (१५ वर्षीय) विद्यार्थी ठार झाला होता. तर आज दुसऱ्याच दिवशी पुन्हा आपघात होऊन दोन तरुण ठार झाल्याने या रोडवर दोन दिवसांत दोन आपघात झाल्याने हा मार्ग मृत्यू मार्ग बनला आहे की काय अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून देण्यात येत होती.

हे पण वाचा

टीम झुंजार