अमळनेर :- तालुक्यातील धार येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन संसार थाटणाऱ्या मांडळ येथील आरोपीला मारवड पोलिसांनी अटक केली असून मुलीच्या जबाबावरून मुलाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धार येथील एक अल्पवयीन मुलगी बस ने शिक्षणासाठी अमळनेर ये जा करीत होती. अशात तिची ओळख मांडळ येथील दिपू जगदीश पाटील या तरुणाशी झाली. त्यांचे दोघांचे प्रेम जुळले.
मुलीने आपल्या बापाचा नम्बर मुलाला दिला. बापाच्या मोबाईल वर नेहमी बोलणे होत असल्याचे मुलीच्या भावाला कळले होते. त्याने तिला रागावल्याने मुलीने दिपूला तिने १३ जून रोजी सकाळी ९ वाजता फोन करून सांगितले की माझा भाऊ मला रागवतो मला येथून काढ. त्यानुसार मुलाने तिला पळवण्याचा प्लॅन केला. मुलीने दुपारी शिकवणीच्या फी साठी ३ हजार रुपये घरून नेले. दोघे जण अमळनेरहून बस ने चोपडा गेले. तेथे भाऊ बहीण असल्याचे सांगून खोली भाड्याने घेतली तेथे शारीरिक संबंध झाले.
तेथून दोघे जळगाव गेले. जळगावला लॉज वर मुक्कामी थांबले तेथेही शारीरिक संबंध झाले. तेथून दोघे रेल्वेने नागपूर गेले. लागलीच नागपूरहून हैद्राबाद गेले. हैद्राबाद ला दोन दिवस स्टेशनवर काढून दिपूने मजुरी कामाचा शोध घेतला. मात्र काम मिळाले नाही म्हणून ते दोघे ट्रक ने तैरूपाल गावी गेले. त्याठिकाणी एम आय डी सी भागात काम शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तेथेही काम मिळाले नाही. म्हणून दोघेही पुन्हा रेल्वेने कोल्हापूर येथे आले आणि बसने नागाव गावाला आले. तेथे एका शेतकऱ्याकडे कामाची मागणी केल्यावर शेतकऱ्याने त्यांना शेतात काम दिले व त्याने शेतातील पत्र्याचे घर बिना भाड्याचे राहायला दिले.
तेथेच राहून दोघेही शेतात काम करू लागले. त्याठिकाणी दोघांमध्ये पती पत्नी प्रमाणे शारीरिक संबंध झाले.इकडे मुलीच्या वडिलांनी हरवल्याची नोंद केली होती. पोलिसांनी तांत्रिक यंत्रणा वापरून मुलाचा पाठलाग सुरू च ठेवला होता. सहाययक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील तेली यांनी सैराट प्रेमी युगुलाचा शोध घेतला.
कोल्हापूर जिल्हयातील शिरोली एम आयडीसी पोलिसांच्या मदतीने या प्रेमीयुगुलला ताब्यात घेऊन मारवड येथे आणण्यात आले. मुलीने दिलेल्या जबाबवरून दिपू विरुद्ध पोस्को व भादवि ३७६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला जळगाव येथे महिला बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.