पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या व्यक्तीला जामनेर विधानसभेची उमेदवारी देणार का? : व्हि.पी.पाटील

Spread the love

जामनेर (राहुल इंगळे प्रतिनिधी) :- आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या आयात केलेल्या व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी देणार का असा प्रश्न आजच्या घेतलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान महाविकास आघाडीचे व्हि.पी. पाटील(सर) यांनी केला.तालुक्यातील नेरी येथील ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.प) यांच्या ताब्यात होती परंतु भाजपाचे नेते व जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी दबाव तंत्राचा वापर करून.

विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर नेरी येथील त्या ग्रामपंचायत सदस्यांचा प्रवेश करवुन घेऊन नेरी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आणली याचे उदाहरण देऊन अशा पक्षविरोधी कारवाया करून पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्याच व्यक्तीला आयात करून भाजपाचेच विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा चालू आहेत.

अशा पद्धतीने अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहुन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून राजकारण केले जात असेल तर याचा महाविकास आघाडीतील प्रत्येक जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्त्ता निच्छीतच निषेध व्यक्त करत आहेत.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांलाच विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी.तर मी वैयक्तिकरित्या पक्षाने सोपविलेली काम प्रामाणिकपणे करेल.आयात केलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपल्याला पर्याय खुला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

हे पण वाचा

टीम झुंजार