चाळीसगाव येथे भुयारी गटार खोदकाम करताना जेसीबी चालक भाजला,विद्युत तारा खाली आल्याने नागरिकांचा जीव धोक्यात

Spread the love

प्रतिनिधी । चाळीसगाव-
चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील पवारवाडी परिसरात सध्या मलनिसारण(भुयारी गटार) योजनेच्या कामाला सुरवात झाली आहे.भुयारी गटार खोदकाम करतांना पवार वाडीतील गणेश मंदिरा जवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे.सदर खोदकाम सुरु असतांना ड्रीम कंट्रक्शन कंपनीच्या जेसीबी ऑपरेटराला विजेचा शॉक लागल्याने तो गंभीररित्या जखमी झाला आहे.

ड्रीम कंट्रक्शन कंपनीचा कर्मचारी (JCB ऑपरेटर) सागर विठ्ठल सरक हा पवार वाडी भागात खोदकाम करत असतांना त्याचा स्पर्श 33KV विद्युत तारेला झाल्याने तो गंभीर रित्या भाजला गेलाआहे ,स्थानिक रहिवाशी त्याच बरोबर नगरसेवविका विजया पवार,चीरागुद्दिन शेख,सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी तत्काळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती केले,सध्या कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असून त्यावर उपचार सुरु आहे.

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात?
पवार वाडी परिसरातून महावितरण कंपनीच्या हाय होल्टेज विद्युत तारा रेल्वेकडे गेल्या आहे.सदर विद्युत वाहिनी तब्बल 33kv इतक्या उच्च दाबाची आहे.स्थानिक नगरसेवक तसेच रहिवाश्यानीं वेळोवेळी महावितरण कंपनीशी हि तार शिप्टिंग करावी अशी मागणी केली होती.परंतु या मागणीकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 132kv सबस्टेशन पासून रेल्वे पर्यंत जाणारी उच्च दाबाची विद्युत वाहिनी(विजेच्या तारा) जमिनी पासून काही फुटावर खाली आल्याने सदर घटना घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.या 33Kv उच्च क्षमतेच्या विद्युत तारा पवार वाडीतून अनेकांच्या घराजवळून गेल्या आहे.सदर विद्युत तारांमुळे परिसरातील नागरिक नेहमी जीव धोक्यात घालून वावरत असतात. वेळोवेळी महावितरणशी संपर्क करूनही या तारा हटवल्या जात नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ड्रीम कंट्रक्शन कंपनीचा कर्मचारी (जेसीबी ऑपरेटर) सागर विठ्ठल सरक हा पवार वाडी भागात खोदकाम करत असतांना त्याचा स्पर्श 33KV विद्युत तारेला झाल्याने तो गंभीर रित्या भाजला गेला,दरम्यान सायंकाळी महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहे.

टीम झुंजार