Video: पोटच्या मुलांसाठी आई-वडिल वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. लहानाचं मोठं केलेल्या या मुलांनी आई-वडिलांच्या म्हातारपणी त्यांना व्यवस्थित सांभाळावं एवढीच त्यांची अपेक्षा असते.पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. राग अनावर झाला की माणूस काय करेल याचा नेम नाही. अशावेळी तो कोणत्याही थराला जातो, मग समोर कुणीही असो. मात्र अशावेळी किमान जन्मदात्या आई वडिलांचं तरी भान राखलं पाहिजे. सध्या असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.ज्यामध्ये मुलाने आपल्या आई-वडिलांना रागाच्या भरात रस्त्यावर चपलेने मारझोड केली आहे.
आईच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात अन् बापही ओक्साबोक्शी रडतोय
मन हेलावून टाकणारी ही घटना श्रीनगरमध्ये घडली असून श्रीनगरमधील एका मुलानं आपल्या आई वडिलांना वर्षभरापासून घराबाहेर काढलं असून ते घरात येण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना रस्त्यावर मारहाण केली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा आई-वडिलांवर हल्ला करण्यासाठी दुचाकीवरून उतरताना दिसत आहे. त्यानंतर तो त्याची चप्पल काढतो आणि त्याचे आई आणि वडील हातात सामान घेऊन उभे असताना त्यांना आक्रमकपणे मारतो. यावेळी तो वडिलांनाही लाथा मारताना दिसत आहे.
यावेळी मुलाच्या हल्ल्यापासून आई-वडिल स्वत:चं संरक्षण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण मध्यस्थी करण्यासाठी आला असता, आईच्या डोळ्यातही अश्रू दिसत आहेत आणि हतबल झालेले वडिलही ओक्साबोक्शी रडत आहेत. आजारी पालकांवर हल्ला केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि नेटिझन्सने कठोर कारवाईची मागणी केली आहे. ताजा बेगम आणि गुलाम अहमद वाणी यांचा मुलगा मोहम्मद अश्रफ वानी असे नाव असलेल्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलानं आई-वडिलांना मारहाण का केली आणि घरात प्रवेश का नाकारला, याचा तपास सुरू आहे.
या संदर्भात, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, आईच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे, ज्यात कलम ७४ (महिलेवर अत्याचार करणे किंवा तिचा राग काढण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी बळाचा वापर करणे) समाविष्ट आहे. कलम १२६(२) (एखाद्याला कायदेशीररित्या परवानगी असलेल्या कोणत्याही दिशेने जाण्यापासून प्रतिबंधित करण्याची कृती आणि कलम ३५१(२) (गुन्हेगारी धमकी). २०२४ चा एफआयआर क्रमांक ७७ चा औपचारिक गुन्हा नौगाम पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४