पारोळा :- पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे किशोर संजय चौधरी रा. तरवाडे ता. पारोळा ह.मु. सातपुर कॉलनी, नाशिक. हा नाशिक शहरातुन व इतर परीसरातुन दुचाकी चोरुन पारोळा पो.स्टे. हददीतील आडगाव, तरवाडे, शिवरे व परीसरात कमी किमतीत विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो.स्टे. हददीत येणार आहे
त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक श्री सुनिल पवार यांनी पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजु विठठल जाधव, पोहेकॉ/२७१८ प्रविण विश्वास पाटील, पोना/३०७४ संदिप सातपुते, पोकों/अभिजित पाटील यांना तात्काळ किशोर संजय चौधरी याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत
त्यावरुन नमुद पथक हे साधारण ३ दिवसा पासुन पारोळा शहर व हददीत किशोर संजय चौधरी याचा कसोशीने शोध घेत होते. दिनांक १२/०९/२०२४ रोजी पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात ईसम नामे किशोर संजय चौधरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता आरोपी किशोर संजय चौधरी याने नाशिक शहर हददीतुन व परिसरातुन मोटार सायकली चोरी केले असल्याचे कबुली दिली असुन त्याचेकडुन चोरी केलेल्या १९ मोटार सायकली हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच नाशिक शहर व परिसरातील विविध पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदर कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेडडी पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर पवार, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव मा सुनिल नंदवाळकर उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग, याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






