झुंजार प्रतिनिधी (प्रकाश शिरोडे) एरंडोल
एरंडोल :- शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल येथे धरणगाव चौफुलीवर रास्ता रोको करून माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पुतळा दहन करण्यात आले. तसेच एरंडोल पोलिस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत कालबाह्य ठरल्यानंतर ती वाचण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या असमर्थ ठरत असताना आयएनएस विक्रांत वाचण्यासाठी देशप्रेमाची हाक देताना मोठ्या प्रमाणात निधी संकलित केला. यासाठी रेल्वे स्थानके, विमानतळांवर उभा राहून खंडणी वजा रक्कम जमा केली. नागरिकांनीही देश प्रेमापोटी सढळ हस्ते मदत केली. आयएनएस विक्रांत वाचण्याच्या मोहिमेत किती रक्कम जमा झाली,या रकमेचा विनियोग कसा करण्यात आला हे आजपर्यंत सोमय्याने कधीही उघड केलेले नाही.
ही रक्कम जमा करत असताना आयएनएस विक्रांतचे भव्य युद्धनौकेत रूपांतर करून सदर निधी राजभवनात जमा करणार असल्याचे त्या वेळी सांगितले होते. मात्र माहिती अधिकारातून घेण्यात आलेल्या माहितीतून धक्कादायक सत्य बाहेर आले. त्यानुसार किरीट सोमय्याने सदर निधी राजभवनावर जमाच केलेला नाही.तसेच राजभवनावर कुठल्याही प्रकारचा धनादेश अथवा धनाकर्ष जमा करण्यात आला नसल्याचे धक्कादायक सत्य लेखी उत्तराद्वारे अवगत करण्यात आलेले आहे.
सामान्य नागरिकांच्या देशप्रेमाच्या भावनेशी त्याने खेळ खेळलेला असून त्याच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर रक्कम व्याजासह वसूल करून शासकीय तिजोरीत त्वरित जमा करण्यात यावी.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी, प्रमोद महाजन संजय महाजन, सुनील माणुधने, संदीप पाटील,हेमंत पाटील,विजय देशमुख, अनिल महाजन,गणेश महाजन,संदीप महाजन, करण पाटील,गजू महाजन,संदिप पाटील,निंबा पाटील,रुपेश माळी,भरत चौधरी,नितीन महाजन,यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.