कुशीनगर (उत्तर प्रदेश):- सद्या भारतात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच जात आहेत अशीच एक महिलांवर अत्याचाराची घटना आहे.उत्तरप्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात दोन ऑर्केस्ट्रा डान्सर्सचे बंदुकीच्या जोरावर अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आठ जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री रामकोला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन तरुणींचे बंदुकीच्या जोरावर अपहरण करण्यात आलेे. त्यांना कप्तानगंज भागातील एका घरी नेऊन त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला, असे पोलिस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितले. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम