एरंडोल :- एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीतील 79 जणांना चाळीसगाव परिमंडळ क्षेत्रातील अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी शहरबंदीचे आदेश काढल्याने एरंडोल शहरात अशांतता पसरविण्याचा व उपद्रवींच्या गोटात खळबळ उडाली आहे. गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभुमीवर एरंडोल पोलीस प्रशासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे प्रस्ताव पाठविले. त्यावर यांनी निर्णय दिला.
18 सप्टेंबरपर्यंत शहर व गाव बंदी
गणेशोत्सव ईद ए मिलादच्या काळात एरंडोल शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे एरंडोल शहरातील उपद्रवी यांना गणेशोत्स व ईद ए मिलादच्या काळात शहरबंदीचे प्रस्ताव तयार करून अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना पाठविण्यात आले. या प्रस्तावावर कविता नेरकर यांनी निर्णय देत दिनांक 16 सप्टेंबर रात्री 12 वाजेपासून 18 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत उपद्रवींच्या शहरबंदीचे आदेश काढले. 79 जणांना 18 सप्टेबर रात्री 12 वाजेपर्यत शहरबंदी, गावबंदी करण्यात आली.
संबंधितांना बजावले आदेश
डीवायएसपी सुनील नंदनवाळकर, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, यांच्याकडून संबधितांना शहरबंदी, गावबंदीचे आदेश बजाविण्यात आले. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल तसेच जो कोणी एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत येईल किंवा या आदेशाचे पालन करणार नाही अश्या उपद्रवींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे डीवायएसपी सुनील नंदनवाळकर, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी सांगितले.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४