एरंडोल :- शहरात गणेश विसर्जन मिरवणूक किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली..सुमारे बारा तास सुरु असलेल्या विसर्जन मिरवणुकीत अठरा सार्वजनिक
गणेश मांडले सहभागी झाले होते.विसर्जन मिरवणुकीत शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक सहभागी झाले होते.पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी
विसर्जन मिरवणुकीस भेट देवून पाहणी केली.शहरात दुपारी चार वाजेपासून गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.पहाटे दोन वाजेच्या सुमारास अखेरच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत प्रमुख अठरा सार्वजनिक गणेश मंडळ क्रमाक्रमाने सहभागी झाले होते.
यावर्षी विसर्जन मिरवणुकीत लाल व पिवळ्या रंगाच्या गुलालाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता.विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवर गुलालाचा सर्वत्र थर जमा होऊन रस्ते लाल व पिवळे झाले होते.नगरपालिका कार्यालयासमोर पालिकेच्यावतीने सर्व गणपतींचे स्वागतकरण्यात आले.मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात असलेले श्रीराम, बजरंगबली, छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,संत सावता माळी,लोकमान्य टिळक,भगतसिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी,भिडे गुरुजी,पंडित प्रदीप मिश्रा यांचे छायाचित्र असलेले फलक तसेच विविध घोषवाक्य असलेले फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
मिरवणुकीत सहभागी झालेले गणेश मंडळांचे कार्यकर्ते शिस्तीत लेझीम खेळत होते.मिरवणुकी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.तसेच मिरवणुकीवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीसअधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी भेट देवून मिरवणुकीची पाहणी करून बंदोबस्ताबाबत माहिती जाणून घेतली. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.अनेक प्रमुख गणेश मंडळांनी मिरवणुकीत गुललाऐवजी कागदी पाकळ्यांचा वापर केला
प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार प्रदीप पाटील,मुख्याधिकारी किरण देशमुख,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रमेश परदेशी,रवींद्र महाजन, किशोर निंबाळकर,राजेंद्र चौधरी,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित पाटील,निवृत्त तहसीलदार अरुण माळी, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,डॉ.सुरेश पाटील,योगेश महाजन,संजय महाजन,भाजपचे सचिन विसपुते,पिंटू राजपूत,प्रमोद महाजन,अतुल महाजन,मोहन चव्हाण,मनसेचे विशाल सोनार यांचेसह विविध राजकीय,सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळ,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शंकर पवार, उपनिरीक्षक शरद बागल,हवालदार अनिल पाटील, मिलिंद कुमावत,शिवाजी पाटील,महेंद्र पाटील,संदीप पाटील राजेश पाटील यांचेसह पोलीस कर्मचारी,गृहरक्षक दलाचे जवान,महसूल व पालिका कर्मचारी,शांतता समिती सदस्य यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल प्रशासनाच्यावतीने मंडळांचे पदाधिकारी व भाविक यांचे आभार मानले.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४