नंदुरबारमध्ये मिरवणुकीत आक्षेपार्ह बँनर झळकाविल्या प्रकरणी, २०० जणांवर गुन्हा दाखल, ५५ जणांना अटक,२३ पोलीस जखमी २७ वाहनांची जाळपोळ.

Spread the love

नंदुरबार :- मध्ये मिरवणुकीत आक्षेपार्ह बँनर झळकाविल्या प्रकरणी गुरूवारी (दि.१९) दोन गटात दंगल उसळली होती. पोलिसांकडून दंगलखोरांची धरपकड सुरू असून याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांसह ५५ जणांना अटक करण्यात असून २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.ही घटना गुरूवारी (दि.१९) दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान घडली. पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, एका मिरवणुकीत एक इसम वाहनावर लहान मुलांला खांद्यावर घेवून उभा राहिला आणि फुले पुतळ्याच्या जवळ उभे राहुन मिरवणुक पाहणाऱ्या माळीवाडयाच्या परिसरातील लोकांकडे पाहून मुला करवी पहेलवानी दंड व पट थोपटत चिथावणी दिली.

शिवाय काहीजणांनी औरंगजेब व टिपू सुलतान यांचे छापील बॅनर्स मिरवणुकीत झळकावीले व हातात एका विशिष्ठ धर्माचे झंडे घेवुन फडकवले आणि त्यावरून दोन गटात दंगल उसळली. यावेळी दंगलखोरांनी तुफान दगडफेक करत जाळपोळ केली. पोलिसांच्या वाहनांनाही लक्ष्य केले होते. यामध्ये पोलिसांच्या वाहनांची तोडफोड व काही पोलिस अधिकारी क्षतीग्रस्त झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर जमाव आटोक्यात आला.

२७ वाहनांसह दुकाने, घरे जाळली

नंदुरबार शहरातील महात्मा फुले पुतळा, राम रहीम चौकी, ईलाही चौक, चिराग अली मशिद, भद्राचौक, बोडरा गल्ली, करीम मंजील, नवनाथ टेकडी शादुर्ला नगर, शाळा क्रमांक ९ व अन्य परिसरात दंगलखोरांनी तुफान दगडफेक केली. प्रामुख्याने पोलिसांना देखील लक्ष बनवण्यात आले. प्रत्यक्ष पोलिसांवर आणि वाहनांवर हल्ला करताना दंगल घडवणाऱ्यांनी दगड, विटा, काचेच्या बाटल्या, धारदार हत्यार यांचा सर्रास वापर केला. पोलीस ठाण्यातील नोंदवलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे की, या हल्ल्यात ६ शासकीय वाहने, २१ खाजगी वाहने तसेच काही दुकानांसह घरांचे जाळपोळ करुन नुकसान करण्यात आले.

इलाही चौक आणि मच्छीबाजारात पडसाद

या घटनेचे पडसाद शहरातील इलाही चौक आणि मच्छीबाजारातही उमटले. तेथेही दगडफेक करण्यात आली. एकीकडे जमाव पांगविला, तर दुसरीकडे त्याचे पडसाद उमटल्याने पोलिसांचीही दमछाक झाली. तेथेही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तशीच परिस्थिती नवनाथ टेकडी परिसरातही होती. तेथेही अश्रुधुराच्या कांड्या फोडून जमावाला नियंत्रित करण्यात आले.

दगडफेकीत २३ पोलीस जखमी

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत २३ पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड, अग्निशमक दलाचे जवान जखमी झाले आहेत. याप्रकरणी एकूण ५१ दंगलखोरांना अटक करण्यात आली असून व्यतिरिक्त दगडफेकीत सहभागी असलेल्या ४ विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान एकुण ५४ निष्पन्न आरोपी व इतर २५० संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश शिवाजी वावरे यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून

धार्मिक स्थळ विटंबनासह खुनाचा प्रयत्न, लोकसेवकाला दुखापत, घातक हत्याराने जबर दुखापत करणे, बेकायदेशिर जमाव करून दंगा करणे, ज्वलनशील पदार्थाने आगळीक करणे, सुरक्षीतता धोक्यात आणणारी कृती, हमल्याच्या उद्देशाने गृह अतिक्रमण, भारतीय हत्यार कायदा कलम ४ चे उल्लघंन, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम इत्यादी संदर्भातील कायदे कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.श्रवणदत्त एस, जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबारनंदुरबार शहरात गुरूवारी दोन गटामध्ये तणाव निर्माण होऊन झालेल्या घटनेबाबत कोणीही अफवा पसरवू नये तसे आढळून आल्यास संबधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. नंदुरबार जिल्हा पोलीस दल सायबर सेल मार्फत समाज माध्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शहरात शातंता प्रस्तापित होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

हे पण वाचा

टीम झुंजार