पारोळा :- तालुक्यात लाचलुचपत विभागाने कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी १ लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला रंगेहात पडकले. सुनील अमृत पाटील (वय-५८) असं ग्रामविस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे तर कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय-२८) असं कंत्राटी सेवकाचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली. दोघं लाचखोरांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
धुळ पिंप्री (ता.पारोळा) येथील तक्रारदार रहिवासी असून ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेवर ब्लॉक करण्याचे एकूण एकूण ४ कामे प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आले होते. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्यासाठी दोन टक्के आणि स्वतःसाठी एक टक्का याप्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती
दरम्यान तक्रारदार यांनी या संदर्भात जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने पळताडणीसाठी आज शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. यावेळी तडजोडी अंती १ लाख रुपये देण्यासाठी लाचेची रक्कम ठरली. त्यानुसार कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमोर १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे पारोळा पंचायत समिती कार्यालयात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






