जामनेर (प्रतिनिधी):- आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात काढण्यात आलेल्या शिव स्वराज्य यात्रे दरम्यान जामनेर मध्ये आयोजित कार्यक्रमात जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून दिलीप खोडपे यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार पक्ष)पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.याच वेळी भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देत दिलीप खोडपे यांनी अधिकृत जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार पक्ष)पक्षात प्रवेश घेतला.
यात्रे दरम्यान आयोजित सभेत युवकचे मेहबुब शेख, पारोळ्याचे आमदार डॉ.सतिष पाटील,माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार एकनाथराव खडसे,डिंगबर पाटील आदींनी जाहीर उमेदवार दिलीप खोडपें यांना मदत करण्याचे सभेला आवाहन करीत.मंत्री महाजन यांच्या कारभाराचे उट्टे काढले.डॉ.अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण योजने बद्दल बोलताना एकीकडे १५०० रूपये देतात आणि दुसरीकडे तेलाचे भाव डाळीचे भाव वाढवतात.त्यापेक्षा बळीराजा शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या.
एकनाथराव खडसे जामनेर तालुक्यातील आपल्या कार्यकाळात करुन घेतलेल्या एकुण १६ धरणांची गावासहीत यादी वाचवुन दाखवत या व्यतिरिक्त मंत्री गिरीष महाजन यांनी कोणती धरणं तालुक्यात बनवली ते दाखवा असे सांगितले.तर जयंत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की.जामनेरच्या तालुक्याच्या विकासाची नवी दिशा खोडपे सरांच्या माध्यमातून सुरू करा कारण त्या परिवर्तनाची आता तालुक्याला गरज आहे. तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेते व पदाधिकारी यांचे कौतुक व अभिनंदन करीत सांगितले की या सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवत समोर असलेले विद्यमान मंत्री महाजन यांच्या दडपशाहीला लगाम घालण्यासाठी दिलीप खोपडे यांनाच आता माझं उमेदवारी द्या.
त्या बाबतीत पक्षाने विचार करून मा.जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या नावाची आपण जामनेर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडुन अधिकृत घोषणा करीत असल्याचे सांगितले.खोडपे(सर) यांनी आपल्या मनोगतात भाजपात गेल्या ३५ वर्षात काम करताना.तालुक्यातुन आशेने काम घेऊन येणारा सामान्य कार्यकर्ता निराश परतताना वाईट वाटायचे. तसेच प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुर केले जात होते.लाभार्थी व काही ठराविक कार्यकर्त्यांच्या मर्जीत तालुक्यातील भाजपाचे राजकारण चालत असल्याने त्याचा परिणाम म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार पक्ष) पक्षात जाहीर प्रवेश केलाय.
पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील कोणत्याही वर्गातील कार्यकर्त्यांच्या सामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण बांधील असल्याची त्यांनी ग्वाही दिली.यावेळी महीला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी,मा.जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, श्रीराम पाटील तालुकाध्यक्ष किशोर पाटील आदींसह जिल्ह्यातील,तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.