कर्जत :- तालुयातील चिकनपाडा पोशीर पाडा येथील तिहेरी हत्याकांडाची उकल झाली असून सख्या भावानेच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एकाला कर्जत पोलीसांनी अटक केली आहे.अजय देवगण याचा दृष्यम चित्रपट बघून त्याने भावाच्याच कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. हनुमंत पाटील असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. चिकनपाडा गावाच्या हद्दीतील पोशीरपाडा या भागातील मदन जैतू पाटील, अनिशा मदन पाटील आणि विवेक मदन पाटील यांचा खून झाला असल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले.
बोरगाव येथील मूळ रहिवासी असलेले मदन पाटील आणि त्याचा भाऊ हनुमंत पाटील हे गेली १५ वर्षे चिकणपाडा गावाच्या हद्दीतील पोशीर पाडा येथे घर बांधून राहत आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दहा वर्षीय विवेक मदन पाटील याचा मृतदेह नेरळ कळंब रस्त्याखालून वाहणार्या नाल्यातील पाण्यात आढळून आला होता. त्यानंतर ३०वर्षीय अनिशा मदन पाटील यांचा मृतदेह देखील त्याच नाल्यातील पाण्यात आढळून आल्यावर ३५ वर्षीय मदन जैतू पाटील यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता.

मुंबई येथील जे जे रुग्णालयात शव विच्छेदन करून आणलेल्या तिन्ही मृतदेहांवर बोरगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून मोठा भाऊ, भावजय आणि पुतण्या यांच्या हत्याकांड प्रकरणी हनुमंत जैतू पाटील याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






