पारोळा :- मागील काही वर्षात शेतीसाठी काढलेले कर्ज वाढतच आहेत. यात सततची नापिकी व अतिपावसामुळे यंदा देखील उत्पन्न हातातून जाण्याची शक्यता आहे. यामुळे कर्ज कसे फेडायचे; या विवंचनेत शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना २२ सप्टेंबरला दुपारी उघडकीस आली. पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील शेतकरी महेंद्र विनायक सोनवणे (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
त्यांच्याकडे दोन बिघे जमीन आहे, त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब झाली आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी काढलेले बँकेचे पीककर्ज भरण्याची नोटीस आली होती, सततची नापिकी व येणाऱ्या उत्पन्नाचा सोर्स नसल्याने, हात उसनवार व सरकारी बँकांचे झालेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत महेंद्र असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

चपलांवरून लागला तपास
सकाळी घरी कोणाला काही न सांगता महेंद्र हे घरातून निघून गेले. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने परिवारातील सदस्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रेय पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. गावातील हिलाल श्रावण भील, अशोक रुमाल भील यांनी विहिरीत उतरून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पारोळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






