पुणे :- गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत, गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं असतानाच आता आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर कोयत्यानं वार करून तिची हत्या करण्यात आली आहे. गौरी लणेश आरे वय 25. राहणार विश्रांतवाडी असं या महिलेचं नाव आहे तर अमोल दिलीप कांबळे वय 25 राहणार धानोरी असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अमोल कांबळे आणि गौरी हे दोघे एकाच शाळेत शिकत होते. शाळेत असल्यापासून अमोलचं गौरीवर एकतर्फी प्रेम होतं. माझ्याशी लग्न कर म्हणून त्याने गौरीकडे तगादा लावला होता. मात्र गौरीला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, तसं तीने त्याला सांगितलं देखील होतं. त्यानंतर गौरीचं लग्न तिच्या कुटुंबाच्या मर्जीनं लणेश धनाजी आरे यांच्याशी झालं.गैरीनं लग्न केल्यामुळे आरोपी अमोल कांबळे हा सुडानं पेटला होता. त्यातच गौरीने त्याच्याशी बोलंण बंद केल्यामुळे तो आणखी चिडला.
त्याने इन्स्टाग्रामवर गौरी आणि तिच्या पतीचा फोटो टाकून भावपुर्ण श्रद्धांजलीची पोस्ट केली. त्यानंतर त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गैरी आपल्या मैत्रिणीसोबत पायी घरी येत असताना तिच्यावर कोयत्यानं वार केला. या घटनेत गौरी गंभीर जखमी झाली, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात गौरीच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४