छत्रपती संभाजीनगर :- जिल्ह्यात आज एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे आईनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.यावर आणखी दुर्दैव म्हणजे अंत्ययात्रेला येताना महिलेच्या भावाचा अपघात झाला. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गल्लेबोरगाव येथील दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होते. रात्री सर्व कामं आटपून मुलगी पल्लवीनं तिच्या आईच्या हातावर मेंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. मात्र सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई न दिसून आल्याने तिने आसपास शोध घेतला. शेवटी आईचा मृतदेह विहिरीत दिसला. याच धक्क्यातून मुलीने कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.बहिणीच्या निधनाची वार्ता कळताच वंदना यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या त्यांच्या भावाचा देखील वाटेत अपघात झाला.
यात ते गंभीर जखमी झाले. वंदना यांच्या आई-वडिलांचेही निधन झाले आहे. आता बहीण आणि भाचीच्या मृत्यूचा त्यांना धक्का बसला आहे. भाची पल्लवी आणि बहीण वंदना दुधारे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अंत्यसंस्कारासाठी ते दुचाकीवरून निघाले होते. पण कुत्रा आडवा आल्यानं त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेऊन ते अंत्यसंस्कारासाठी गल्लेबोरगावात दाखल झाले. रात्री घरातील सर्व कामं आटोपल्यानंतर वंदना दुधारे यांनी हातांवर मेंदी काढली.
वंदना यांनी त्यांच्या हातावर मेंदीनं पती आणि मुलाचं नाव लिहिलं होतं. इतकंच नाही तर वंदना यांनी पल्लवीच्या हातावरही मेंदी काढली होती. त्यानंतर रात्री दोन्ही माय-लेकी झोपी गेल्या. पल्लवीला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली असता तिला घरात आई दिसली नाही. तिने घराजवळच्या विहिरीजवळ जाऊन बघितलं असता तिला विहिरीच्या पाण्यावर आईचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर पल्लवीनं कोणताही विचार न करता विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पतीचा आक्रोश
दुसरीकडे, वंदना यांचे पती भारत दुधारे सकाळी उठले. त्यांना घरात पत्नी आणि मुलगी दिसले नाहीत. त्यांनी शेजारच्यांकडे चौकशी केली असता त्यांनी पल्लवी विहिरीकडे गेल्याचं सांगितलं. भरत यांनी विहिरीकडे जाऊन बघितले असता. त्यांनी वंदना आणि पल्लवीचा मृतदेह आढळून आला. गावातील लोकांच्या मदतीने वंदना आणि पल्लवीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले दुधारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट जमादार राकेश आव्हाड , रमेश वडजे करीत आहेत.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४