VIDEO! आमदारांन सोबत गौतमी पाटील ने धरला ठेका, ‘चांदी के डाल पर.’ गाण्यावर केला भन्नाट डान्स,पहा व्हिडिओ.

Spread the love

VIDEO मुंबई : सबसे कातिल गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. मागचे दोन वर्ष फक्त गौतमी पाटील या नावाची चर्चा आहे. कार्यक्रम कोणताही असो तिथे गौतमीची हजेरी ही असतेच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सगळेच गौतमीचे फॅन आहेत. गौतमी सगळ्यांनाच तिच्या तालावर नाचवते. भाजप आमदार देखील गौतमीच्या पुढ्यात स्वत:ला रोखू शकले नाहीत. भाजप आमदाराचा गौतमीबरोबर ‘चांदी के डाल पर…’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दहीहंडीच्या निमित्तानं गौतमी पाटील मुंबईत आली होती. मुंबईसह तिनं महाराष्ट्राच्या अनेक भागात दहीहंडी कार्यक्रमात भाग घेतला. गौतमी यवतमाळच्या उमरखेड मध्ये भाजप नेत्यांनी भव्य दहीहंडी महोत्सवात गेली होती. यात आपल्या पिळदार मिश्यावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या आर्णीचे भाजप आमदार डॉ संदीप धुर्वे ह्यांनी तुफान डान्स करून धम्माल केली. हजारोंच्या गर्दीत आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी गौतमीबरोबर ठेका धरला. ‘चांदी के डाल पर…’ या गाण्यावर त्यांनी डान्स केला. गौतमीनं देखील त्यांच्याबरोबर ठेका धरला.

आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती. मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. दरम्यान उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना आमदार मात्र नाचगण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली.गौतमी पाटील हिला मराठी बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी सगळेच आतूर होते.

तिला बिग बॉसची खुली ऑफर देण्यात आली होती असं तिनं सांगितलं. बिग बॉसच्या घरात वॉईल्ड कार्डद्वारे थेट एन्ट्रीची खुली ऑफर देण्यात आली होती. राज्यभरातील नियोजित शोजच्या तारखा आधीच फिक्स झाल्या आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिल्याचं गौतमी पाटीलने सांगितलं. त्यामुळे आता चर्चांवर पूर्णविराम लागला असून गौतमी बिग बॉस करणार नसल्याचं कन्फर्म झालंय.

टीम झुंजार