.
यवतमाळ– विदर्भातील यवतमाळमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्राचार्य पत्नीचा सत्कार सोहळा सुरु असताना कार्यक्रमादर्यान पतीचे पत्नीच्या डोळ्यादेखत दु:खद निधन झाले आहे. या घटनेमुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या शेकडो लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
विकास महाजन असे मृत्यू झालेल्या पतीच नाव असून ते आर्णी नाका परिसर, यवतमाळ येथील रहिवासी आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत पार्चाय पदावर असलेल्या डॉ. रेखा महाजन ह्या प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता. यावेळी महाजन यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शनपर भाषण केले व ते मंचावर बसले. दरम्यान अचानक त्यांना भोवळ येऊन ते खाली कोसळले. कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी महाजन यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णलायात पोहचण्याआधीच वाटेतच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.