धक्कादायक! एका वधूनं तेरा दिवसांत केली तीन पुरुषांशी विवाह; हनिमूनच्या रात्री लाखो रुपये घेवून बॉयफ्रेंड सोबत फरार.

Spread the love

इंदुर: विवाहाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. विवाहाचं आमिष दाखवून गंडा घालण्याच्या घटनादेखील घडत आहेत. मध्य प्रदेशात अशाच प्रकारची घटना घडली. एका वधूनं तेरा दिवसांत तीन पुरुषांशी विवाह केला.लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर तिनं या तिघांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी या वधूसह तिच्या टोळीतल्या चौघांना अटक केली आहे.मध्य प्रदेशातल्या इंदुरमध्ये एका लुटारू वधूसह तिच्या टोळीचा पर्दाफाश झाला.

या वधूने तेरा दिवसांत एकामागून एक तीन विवाह केले आणि तिन्ही वरांना लुटलं. या वधूला एक बॉयफ्रेंड असून, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, सर्व प्रकरण उघडकीस आलं. तीन जणांशी विवाह केल्यावर त्यांची लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या या वधूसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. इतरांना अद्याप अटक झालेली नाही.या महिलेच्या पहिल्या पतीला तिच्या बॉयफ्रेंडविषयी माहिती मिळाली. तो कसा तरी त्याच्यापर्यंत पोहोचला. त्याने जेव्हा महिलेच्या कृत्याचा पाढा वाचला तेव्हा पतीच्या पायाखालची वाळू सरकली. तिनं एक नाही तर अनेक विवाह केले आहेत.

अनेकांना या प्रकारे फसवलं आहे. ही माहिती समजताच फिर्यादीने इंदूर पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पुढची कारवाई केली जात आहे.या बनावट वधूची माहिती तिच्या पहिल्या पतीने गुन्हे शाखेला दिली. या व्यक्तीला महिलेने 15 लाखांचा गंडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर गुन्हे शाखेला काही दिवसांपूर्वी फिर्यादीने तक्रार करून सांगितलं, की त्याच्या पत्नीने त्याची 15 लाख रुपयांना फसवणूक केली आहे. कुटुंबीयांच्या मदतीनं तिनं अनेकांशी विवाह केला आहे.महिलेची टोळी वृत्तपत्र आणि मॅट्रोमोनियल साइटच्या जाहिरातीच्या मदतीनं वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे.

विवाहानंतर वधू आणि तिचा बनावट नातेवाईक लाखो रुपये वसूल करून फरार होत. फिर्यादीच्या तक्रारीनंतर इंदूर गुन्हे शाखा सक्रिय झाली आणि तपासात धक्कादायक माहिती उघड झाली.पोलिसांनी सांगितलं, की फिर्यादीच्या तक्रारीवरून प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यात पोलिसांना आरोप सिद्ध होणाऱ्या अनेक गोष्टी आढळून आल्या. त्यानंतर वधू बनून लोकांना लुटणाऱ्या महिलेसह तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली.या महिलेनं मुंबईतल्या दीपेश नावाच्या व्यक्तीला खोटं नाव सांगून त्याच्याशी विवाह केला.

त्यानंतर काही महिन्यांत त्याला सोडून खोटी कागदपत्रं तयार करून राजस्थानमधल्या लक्ष्मण नावाच्या युवकाशी विवाह केला. तिनं फिर्यादीशी विवाह करून त्याला घरजावई करून घेतलं, असं निष्पन्न झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पतीला इंदूरमध्ये घरजावई बनवून या महिलेनं दुसऱ्या आणि तिसऱ्या पुरुषाशी विवाह केला आणि तीन दिवसांत दोघांकडून पैसे घेऊन गायब झाली. या बनावट महिलेनं एकूण 13 दिवसांत तीन विवाह केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार