Viral Video: वसतिगृहाच्या वॉर्डन व प्रभारीसह तीन जणांनी विद्यार्थीनीला बंद खोलीत केली बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल पहा व्हिडिओ
Viral Video: उत्तर प्रदेशातील मथुरा येथील वसतिगृहाच्या वॉर्डन आणि प्रभारीसह तीन जणांवर एका विद्यार्थीनीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपींनी विद्यार्थिनीला एका खोलीत कोंडून तिला बेदम मारहाण केली.या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी वॉर्डनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कीर्ती कुमारी सेंगर असे पीडितेचे नाव आहे. ती हाथरसची रहिवासी आहे आणि जीएलए युनिव्हर्सिटी, मथुरा येथून बी.टेक तिसऱ्या वर्षात शिकत आहे. वृत्तानुसार, जैत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजाई हायवेवर असलेल्या लावी गर्ल्स हॉस्टेलमध्ये ही घटना घडली. ही विद्यार्थी 2022 पासून येथे राहते. B.Tech students Beaten up 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी कीर्ती वसतिगृह सोडून दुसऱ्या ठिकाणी जात होती.
दरम्यान, हॉस्टेल वॉर्डन रुबीने कथितपणे काही शेरेबाजी केल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर हॉस्टेल इन्चार्ज जयपाल, त्याचा भाऊ आरके आणि वॉर्डन रुबी यांनी कीर्तीला दरवाजा बंद करून मारहाण केल्याचा आरोप आहे.कीर्तीचा आरडाओरडा ऐकून तिच्या मित्रांनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि दरवाजा उघडून तिला वाचवले. काही विद्यार्थिनी गेट उघडून पीडितेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.
लिंकवर क्लिक करा व पहा व्हिडिओ
मथुरा शिक्षा माफियाओं का गढ है।ये घटना मथुरा में स्थित @GLA यूनिवर्सिटी के हॉस्टल की है जहां बीटेक की छात्रा कीर्ति सेंगर की कमरा बंद करके उसके साथ बदतमीजी की पिटाई की जा रही है। वार्डन और अन्य स्टाफ है।
ये यूनिवर्सिटी तुरंत बंद हो। @BhimArmyChief @yadavakhilesh @CMOfficeUP pic.twitter.com/ghxlYlZkl4— Sanjeev kumar (@Sanjeev20815699) September 18, 2024