शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित पुरस्कार वितरण व कार्यगौरव सोहळा उत्साहात संपन्न
एरंडोल :- येथे शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था उत्राण आयोजित पुरस्कार वितरण व कार्यगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील होते तर प्रमुख मान्यवर म्हणून जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, व्याख्याते प्रा.सचिन देवरे,शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, कृषी विभाग डी आर पी समाधान पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, एरंडोल पंचायत समिती माजी सभापती अनिल महाजन, आदिवासी संस्था अध्यक्ष मोनिका शिंपी, शेतकी संघ संचालक पांडुरंग जाधव, माजी सरपंच सुरेश महाजन, संस्था अध्यक्ष अमोल महाजन व आदी मान्यवर उपस्थित होते
सुरवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आणि कार्यक्रम प्रसंगी व्याख्याते प्रा. सचिन देवरे यांचे व्याख्यान झाले तसेच समाधान पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती सदर कार्यक्रमात दिली आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कृषी, उद्योग व व्यवसाय क्षेत्रात सन २०२३-२४ मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील ३५ पुरस्कार प्राप्त पुरस्करार्थिंना कार्य गौरव करून विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष अमोल महाजन यांनी केले तर ज्ञानेश्वर आमले, वासुदेव पाटील, मनोहर ढीवरे, मोनिका शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले तर आबासाहेब चिमणराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले असून सूत्रसंचलन प्रा.शुभांगी परदेशी यांनी तर आभार सुजाता अत्तरदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरस्कार निवड व वितरण समिती प्रमुख विलास महाजन, संस्था सचिव रेणुका महाजन, संचालक सागर महाजन व राजु कोळी यांनी प्रयत्न केले.