.
मुंबई : संपूर्ण राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे औष्णिक वीज निर्मीतीचे काही ठिकाणचे संच बंद आहेत. त्यात उन्हाळा असल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राज्यवार लोडशेडींचे संकट आले आहे. अशातच राज्यावरील लोडशेडिंग टाळण्यासाठी वाढीव दराने वीज खरेदी करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलाय.कोळशाच्या तुटवड्यामुळे अतिरिक्त वीज घ्यावी लागणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली आहे.
राज्याच लोडशेडींग होवू नये. याचा विषय कॅबिनेटमध्ये झाला. वीजमागणी वाढत असताना दुसरीकडं कोळसा साठा कमी येतोय. कधी कधी रेल्वेचे रॅक कोळशासाठी उपलब्ध होत नाही आहेत. कोयना येथे 17 TMC पाणी आहे. एका दिवसाला एक TMC पाणी लागते 17 दिवसांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली. वीज निर्मिती केंद्र अडचणीत आहेत. भारनियमन वाढण्याची शक्यता असल्याचं ते म्हणालेत
वीज दहा ते बारा रूपयांना मिळते. पण आता बाजारात वीज मिळत नाहीय. गुजरातमध्ये आठवड्यातून एक दिवस वीज बंद केली असल्याचं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. सीजीपीएल कंपनीसोबत 700 मेगावॅटचा करार केला होता. त्यासाठी परदेशातून कोळसा आणावा लागतो. इथून आम्हाला साडेचार रूपयेने वीज मिळणार आहे. याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाल्याचं ऊर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे.
आम्ही भारनियमन होऊ देणार नाही असं म्हणत ऊर्जामंत्र्यांनी 28,700 मेगावॅटची सध्याची विजेची मागणी आहे. जी 30 हजार पर्यंत जाऊ शकते. अल्पमुदतीसाठी वीज विकत घ्यावी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वीजेचे संकट सोडवण्यासाठी कोळसा मंत्री तसंच केंद्रीय ऊर्जामंत्री मदत करत आहेत. ही चांगली बाब असल्याचंही ते म्हणालेत.