झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल – येथील औदुंबर साहित्य रसिक मंचातर्फे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या सोहळ्यात एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी आपली जीवाची पर्वा न करता कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत
माजी विधानसभा सभापती महाराष्ट्र राज्य प्रा.अरुणभाई गुजराथी,आमदार आबासाहेब चिमणराव पाटील,औदुंबर साहित्य रसिक मंचाचे अध्यक्ष दादासाहेब अॅड मोहण शुक्ला याच्या हस्ते नागरिक सन्मान म्हणून विशेष गौरव करण्यात आले
याप्रसंगी जेष्ठ डॉ. के.ए बोहरी,मंचाचे सचिव तथा कवी अॅड विलास मोरे, उपाध्यक्ष वा.ना.आंधळे जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन यांच्या सह अनेक दिग्गज कवि व मान्यवरांची उपस्थिती होती
विक्की खोकरे यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन वर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना दररोज फळे, बिर्याणी,सुप असे विविध प्रकारचे सकस आहार देऊन त्यांची प्रतिकारशक्ती व मनोबल वाढवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले होते
त्याचा या विशेष सन्मान मिळाल्या बदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे