राजकीय श्रेय लाटण्यासाठी शिवरायांच्या अर्धवट झाकलेल्या पुतळ्याची विनापरवानगी मिरवणूक.
सामाजिक संघटनांकडून आयोजकांवर कायदेशीर कारवाईची मागणीची तक्रार
जामनेर(प्रतिनिधी):- मतांच्या राजकारणातुन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पॉलीथिन सारखे आच्छादन वापरून फक्त चेहरा झाकून बाकी अर्धवट झाकलेल्या पुतळ्याची शहरात विनापरवानगी मिरवणूक काढणाऱ्या अतिउत्साही आयोजकांवर कायदेशीर कारवाईची तक्रार काही सामाजिक संघटनांनी पत्राद्वारे पोलिस स्टेशनमध्ये देवुन.तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर बहु प्रतिक्षीत असलेल्या राजमाता जिजाऊ चौकात निर्माणाधीन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचे सुशोभीकरणाचे काम चालु असुन.
ते अजुन पुर्ण झालेले नाही परंतु लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागु शकते या कारणामुळे उशीरा होणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळा लोकापर्ण सोहळा समोर ठेवून त्यातुन मतांचे राजकारण साध्य करण्याच्या हेतुला बाधा येवु शकते म्हणून काही अतिउत्साही आयोजकांनी पुतळ्याच्या जागेचे काम अपूर्ण असताना शिवरायांचा पुतळा शहरात आणून.महापुरुषांच्या पुतळा वा प्रतिमां बाबत शासनाने घालुन दिलेल्या संहिताना हरताळ फासत सदर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर फक्त पॉलीथिन सारख्या प्रकारचे आच्छादन ठेवून बाकी पुतळा तसाच अर्धवट उघडा स्थितीत ठेवुन एका वाहनावरून कुठल्याही प्रकारची पोलिस प्रशासन व नगर परिषदेची परवानगी न घेता डी.जे.लावुन मिरवणूक काढली.
या प्रकाराची माहिती होताच शहरातील शिवप्रेमी संघटनांनी नोंद घेत या प्रकाराचा निषेध केला व पोलीस स्टेशनमध्ये अशा अतिउत्साही आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तक्रारी अर्ज दिला असुन.तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकुणच या अशा प्रकारामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न सत्तेत असलेल्या राजकीय पक्ष नेतृत्वाकडून होत असल्याचा आरोपही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान केला यात नरेंद्र जंजाळ, प्रदीप गायके,राजेंद्र खरे,मनोज महाले, कृष्णा माळी, उपस्थित होते.