झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे दिनांक 7/4/2022 गुरुवार रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त एरंडोल दिवाणी व फौजदारी न्यायालयात दुपारी २:३० वाजता विधी सेवा समिती तर्फे उत्तम आरोग्य राखण्या विषयी मार्गदरशनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहेरबान न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.एस. धोंडगे साहेब हे होते उत्तम आरोग्य राखण्या विषयी प्रमुख वक्ते म्हणून एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुधीर काबरा यांनी उपयुक्त व महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली
उत्तम आरोग्य राखण्यासाठी दिनचर्या आहार व्यायाम प्राणायाम योग व विश्रांती त्याच प्रमाणे चाळीस वर्षानंतर वर्षातून एकदा संपूर्ण शरीराची शाररिक तपासणी करून घेण्याबद्दल अत्यंत उपयुक्त व महत्वपूर्ण मार्गदर्शन उपस्थितांना केले. डॉ उमाकांत मराठे,केशव ठाकूर यांनी उत्तम आरोग्य विषयक महत्वपूर्ण माहिती दिली अध्यक्षीय भाषणात मेहरबान न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.एस.धोंडगे साहेब यांनी आहार,व्यायाम व मानसिक ताण तणाव ह्याविषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड एम. एम. महाजन