अनैतिक सबंधासाठी पत्नीने नवऱ्याचा चमचमीत मासे खायला घातले,अन् काढला त्याच्या काटा,कारण ऐकून कुटुंबीयांना बसला मोठा धक्का 

Spread the love

अनैतिक सबंधासाठी पत्नीने नवऱ्याचा चमचमीत मासे खायला घातले,अन् काढला त्याच्या काटा,कारण ऐकून कुटुंबीयांना बसला मोठा धक्का 

ग्वालियर :- नवऱ्याला चमचमीत मासे खाऊ घातले. घरात जेवणाचा फक्कड बेत झाला. त्यानंतर नवऱ्याला दारुही पाजली आणि त्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच नवऱ्याच्या जीवावर उठली.पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. पत्नीनं असा काटा काढला की कुटुंबियांनाही याची कल्पना आली नाही.लोकेंद्र वडील नंदलाल आणि पत्नी अंजली कुशवाह यांच्यासोबत राहत राहात होता. गुरुवारी तिच्या मावशीचा मुलगा नंदू हा अंजलीला भेटायला आला होता.

दुपारी तीनच्या सुमारास नंदलाल कुशवाह घरी पोहोचला, तेव्हा अंजलीने सासऱ्यांना सांगितलं, लोकेंद्र झोपला आहे. लोकेंद्रचं डोकं खूप दुखत असल्याने तो आराम करतोय. त्याच्यासाठी औषध घेऊन यायचं आहे.मेहुणा मनोज कुशवाहाच्या घरी जायचं असल्याचं आरोपी पत्नीनं सासऱ्यांना सांगितलं. सासरे नंदलाल औषध घेण्यासाठी गेले आणि काही वेळाने ते घरी परतले तेव्हा घरात शांतता होती, सगळे लाईट बंद होते. सून आणि नंदू घरी नव्हते. लोकेंद्र खोलीच्या आत बेडवर पडलेला होता. मुलगा लोकेंद्रला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतीच हलचाल न झाल्याने सासरे घाबरले आणि त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी पीडित पतीला मृत घोषित केलं.मृतदेह घेऊन ते घरी पोहोचले आणि ते अंतिम संस्कारासाठी नेण्याची तयारी करू लागले. त्यानंतर मृताच्या मानेवर ओरखड्याच्या खुणा दिसल्या. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी पुन्हा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला आणि गुन्हेगार शोधून काढला. पत्नीच खरा गुन्हेगार असल्याचं पोलिसांसमोर आलं. पत्नीची कसून चौकशी केल्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून धक्काच बसला.

आरोपी पत्नी अंजलीने तिचा गुन्हा मान्य केला. जे काही केले त्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचे तिने पोलिसांना स्पष्ट सांगितले. अंजलीने चौकशीदरम्यान सांगितले की, लोकेंद्र आणि गौरव कुशवाह हे मित्र होते. गौरवची आर्थिक स्थिती लोकेंद्रपेक्षा जास्त चांगली होती. त्यातूनच आमचं एकमेकांवर जीव जडला. एकमेकांच्या प्रेमात एवढे बुडालो की आम्हाला त्याचा काटा काढावा लागला. प्रेमासाठी मी लोकेंद्रला आमच्या मार्गातून कायमचं काढून टाकलं अशी कबुली तिने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी गौरव आणि अंजलीला बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर इथल्या गिरवाई पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगली खळबळ उडाली. अनैतिक प्रेमातून पत्नीने नवऱ्याचा मासे खायला घालून काटा काढल्याने दोन्ही कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी