सहा महिन्यांपूर्वी चिमुकलीच्या जन्म,घरात आनंदाचं वातावरण,पण अस काय? कारण होत की महिला डॉक्टरने बाळासह नदीत उडी घेत संपविले जीवन.

Spread the love

छत्रपती संभाजीनगर :- एका महिला डॉक्टर आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने त्या डॉक्टरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. आता या महिलेने हे टोकाचं पाऊल का उचललं त्यामागील कारणही पुढे आलं आहे.पैठण तालुक्यातील बी.एच.एम.एस डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे (रा. चांगतपुरी, ता. पैठण) असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे. त्यांनी अंगावर दूध येत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अंगावर दूध येत नसल्याने त्या बाळाला दूध देवू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या नैराश्यात होत्या. त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

पैठण येथील प्रभाकर महिलेने यांच्याशी पूजा यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. त्या आपल्या बाळाची खूप काळजी घेत होत्या. पण, त्यांच्या अंगावर दूध येत नसल्याने त्यांना बाळाला दूध देता येत नव्हता. त्यामुळे त्या सतत त्याबाबत विचार करत होत्या. त्यामुळे त्या तणावाखाली होत्या.याच नैराश्यात असताना मंगळवारी त्यांनी नेहमीच्या रिक्षा चालकाला घरी बोलावलं. सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन रिक्षात बसल्या. त्यांनी रिक्षा चालकाला पैठण शेगाव मार्गावरील पाटेगाव येथे पुलावर नदी बघायचं आहे सांगून थांबायल लावलं. त्यानंतर काही वेळ त्या बाळासह नदीकडे बघत राहिल्या आणि काहीच वेळात त्यांनी पुलाच्या कठड्यावरुन थेट नदीत उडी घेतली.

हे सारं झालं तेव्हा रिक्षा चालक तिथेच होता. पण, पूजा या असं काहीतरी करणार आहेत, याची काहीही कल्पनी नसल्याने तो या दोघांना वाचवू शकला नाही. घटना घडताच त्याने तात्काळ याबाबत स्थानिकांना माहिती दिली आणि मग पोलिसांना कळवण्यात आलं.घटनेची माहिती मिळताच पोलीस ओआणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बऱ्याच वेळ शोध घेतल्यानंतर पूजा यांचा मृतदेह सापडला पण बाळाचा मृतदेह सापडला नाही. या घटनेने महिलेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

मला चांगतपुरीला जायचे आहे असे म्हणत ही डॉक्टर महिला मंगळवारी रिक्षास्टँडवर येत रिक्षात बसली. पावणे सातच्या सुमारास पाटेगाव पुलावर रिक्षा आल्यावर पाणी बघायच्या निमित्तानं ती रिक्षातून उतरली. रिक्षातून खाली उतरताच गोदावरी पात्रात या महिलेनं बाळासह उडी मारली. रिक्षावाल्यानं आरडाओरडा करताच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. पैठण पोलिसांना खबर कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याबाबत अधिकचा तपास सुरु आहे.

स्थानिक मच्छीमार गोदावरी पात्रात उतरले

या महिलेनं बाळासहीत गोदावरी पात्रात उडी मारल्याचं कळताच स्थानिक मच्छीमारांनी गोदावरी नदीत उतरत तब्बल दोन तास महिला व बाळाचा शोध घेतला. या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृत महिलेला बाहेर काढण्यात आलं पण बाळाचा शोध लागला नाही.

मुख्य संपादक संजय चौधरी