बेल पत्र टाकण्यासाठी बहिण-भाऊ गेले नदीवर, भाऊच्या पाय घसरल्याने पडला नदीत, बहीण गेली वाचवायला दोघांच्या दुर्दैवी मृत्यू.

Spread the love


शिंदखेडा :- तालुक्यातील सोनेवाडी गावात दुर्दैवी घटना घडली. नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. सर्वपित्री अमावस्यानिमित्त गावा जवळच असलेल्या तापी नदी पात्रात दोघे भाऊ बहिणी हे बेल पत्र टाकण्यासाठी गेले होते.या नदीपात्राजवळ उत्कर्ष रमेश पाटील (वय 13) राहणार सोनेवाडी याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. त्यावेली, त्याला वाचवण्यासाठी त्याचीच बहीण वैष्णवी सुरेश पाटील हिने नदीपात्राकडे धाव घेतली. मात्र, भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने ती देखील पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली असू न पोलिसांनाही पाचारण्यात करण्यात आलंय.

नदीपात्रात दोघे चिमुकले बुडत असल्याचे पाहून सदर ठिकाणी वैष्णवीच्या काकांनी देखील दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणी जास्त असल्याने त्या दोघांना वाचण्यात त्यांना अपयश आले. नदी पात्रातून बाहेर काढल्यानंतर दोघांनाही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्या दोघा बहिण भावांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सर्वपित्री अमावस्येचा अर्थ म्हणजे पितरांचे स्मरण करणे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे हा आहे. या दिवशी पूजा आणि दानाचे फळ आपल्याला मिळते. यावेळी लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे आर्थिक संकटातून दिलासा मिळेल, अशी धारणा मानण्यात येते. मात्र, हीच सर्वपित्री अमावस्या दोन चिमुकल्यांच्या जीवावर बेतली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी